Arjun Kapoor : 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाच्या प्रमोशनला अर्जुनला लग्नाचा प्रश्न, उत्तर देताना म्हणाला...

Arjun Kapoor Marriage Plans: 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अर्जुन कपूरने पहिल्यांदा आपल्या लग्नावर भाष्य केले आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या.
Arjun Kapoor Marriage Plans
Arjun KapoorSAAM TV
Published On

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' यामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अर्जुन कपूर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळत आहे. 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटात अर्जुन कपूरसोबतच अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Pret Singh) देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

अर्जुन कपूर अनेक वेळा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच वेळी अर्जुन कपूरला वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा अर्जुन कपूरने आपल्या लग्नवर भाष्य केले. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अर्जुन कपूरला तो खऱ्या आयुष्यात कधी लग्न करणार? असा प्रश्न विचारण्यात आला.

प्रश्नावर उत्तर देत अर्जुन कपूर म्हणाला की, "जेव्हा माझे लग्न होईल तेव्हा मी तुम्हाला सर्वांना सांगेन. आज चित्रपटाचा कार्यक्रम आहे. तर आपण चित्रपटाबद्दल बोलूया. जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा मी माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल पुरेसे संभाषण करण्यासाठी परवानगी दिली आहे. आता चित्रपटाचे सेलिब्रेशन करूया. आता 'मेरे हसबंड की बीवी' च्या सेलिब्रेशनची वेळ आहे. जेव्हा माझ्या पत्नीबद्दल बोलण्याची वेळ येईल तेव्हा मी योग्य क्षणी तुमच्याशी बोलेन. "

'मेरी हसबंड की बिवी' रोमकॉम चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक पाहायला मिळत आहे. अर्जुन कपूर अनेक वर्ष बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला (Malaika Arora) डेट करत होता. गेल्यावर्षी दिवाळीमध्ये अर्जुन कपूरने आपण सिंगल असल्याचे सर्वांना सांगितले होते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडची खास जोडी होती. यांना वयामुळे अनेक वेळा ट्रोल देखील करण्यात आले होते. आता चाहते 'मेरी हसबंड की बिवी' पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Arjun Kapoor Marriage Plans
Sudha Murthy : सुधा मूर्ती यांच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com