Viral Video : महिला प्रोफेसरचा प्रताप, भर वर्गात विद्यार्थ्याशी केलं लग्न; व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दिलं स्पष्टीकरण

Professor Marries Student Viral Video : बंगालच्या एका यूनिव्हर्सिटीमध्ये महिला प्रोफेसरने तिच्या विद्यार्थाशी लग्न केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विद्यार्थी प्रोफेसरच्या गळ्यात मंगळसूत्र घालत आहे.
Professor Marries Student Viral Video News
Professor Marries Student Viral Video NewsSaam Tv
Published On

Viral Video News : आजकाल सोशल मीडियावर असंख्य विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला प्रोफेसर तिच्याच विद्यार्थ्यांशी लग्न करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. हा व्हिडीओ पश्चिम बंगालच्या एका यूनिव्हर्सिटीमध्ये असल्याचा दावा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओमधील महिला या पश्चिम बंगालच्या नादियामधील यूनिव्हर्सिटीच्या अप्लाइड सायकोलॉजी या विभागाच्या प्रमुख पायल बॅनर्जी आहेत. त्यांनी नवरीसारखा पेहराव केला आहे. पायल यांच्या समोर त्यांचा एक विद्यार्थी आहे. पायल बॅनर्जी आणि त्यांचा विद्यार्थी वर्गामध्ये सर्वांसमोर लग्नाचे विधी करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. पण त्यांनी खरंच लग्न केलं का? जाणून घेऊयात..

व्हायरल व्हिडीओमध्ये पायल आणि त्यांचा विद्यार्थी या दोघांच्याही गळ्यात पुष्पमाळा आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला विद्यार्थी पायल यांच्या गळ्यात मंगळसुत्र घालताना दिसतो. त्यानंतर तो कपाळावर कुंकू लावत असल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. सायको प्रोजेक्ट अंतर्गत हे सर्वकाही सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूनिव्हर्सिटीने प्रोफेसर पायल यांच्या विरोधात तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

Professor Marries Student Viral Video News
Viral Video: मेट्रोचा आखाडा केला, दोन जणांमध्ये तुफान हाणामारी, प्रवासी पाहतच राहिले, VIDEO व्हायरल

यूनिव्हर्सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर भाष्य केले. त्यांनी या गोष्टीची माहिती नसल्याचे सांगितले. सायकोलॉजी विभागाच्या प्रमुख पायल बॅनर्जी यांनी हा व्हिडीओ सायको ड्रामाचा भाग असल्याचे सांगितले. वर्गात एका प्रोजेक्टसाठी त्यांनी लग्न आणि त्याचे विधी सुरु होते अशी माहिती त्यांनी दिली.

Professor Marries Student Viral Video News
Viral Video: गर्दीतून वाट काढत तो आला, डोळे भरून पाहिलं अन्, आजीच्या अंत्यदर्शनाला वानराची उपस्थिती; कृती पाहून सारे चकीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com