Viral Video: गर्दीतून वाट काढत तो आला, डोळे भरून पाहिलं अन्, आजीच्या अंत्यदर्शनाला वानराची उपस्थिती; कृती पाहून सारे चकीत

Chandrapur Monkey Viral Video: एखाद्याच्या अंत्यसंस्कारामध्ये एखादं वानर आलं असं जर तुम्हाला सांगितलं तर त्यावर तुम्हाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अशीच घटना महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमध्ये घडली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलर होत आहे.
Viral Video: गर्दीतून वाट काढत तो आला, डोळे भरून पाहिलं अन्, आजीच्या अंत्यदर्शनाला वानराची उपस्थिती; कृती पाहून सारे चकीत
Chandrapur Viral VideoSaam Tv
Published On

मानवी वस्तीमध्ये अनेकदा जंगलामध्ये राहणारे प्राणी येत असतात. माणसांसारखे अनुकरण करताना त्यांना तुम्ही पाहिले ही असेल. या प्राण्यांचे असे कृत्य पाहून आपल्याला देखील आश्चर्य वाटते. त्यांचे असे अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वानर आणि माकडांना तुम्ही कधी कोणाच्या लग्नामध्ये, एखाद्या मंदिरामध्ये तर कधी कोणाच्या घरामध्ये आल्याचे पाहिले असेल. पण एखाद्याच्या अंत्यसंस्कारामध्ये एखादं वानर आलं असं जर तुम्हाला सांगितलं तर त्यावर तुम्हाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अशीच घटना महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेमूर्डा गावानजीक असलेल्या पिंपळगाव मारुती येथील विजय धवने यांच्या मातोश्री अनुसया मारोती धवने यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. अनुसया यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरासमोर ठेवलं होतं. अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले अनुसया यांचे पार्थिव घेऊन नातेवाईक स्मशानभूमीच्या दिशेने निघणार होते. तेवढ्यात त्याठिकाणी एक वानर आले.

Viral Video: गर्दीतून वाट काढत तो आला, डोळे भरून पाहिलं अन्, आजीच्या अंत्यदर्शनाला वानराची उपस्थिती; कृती पाहून सारे चकीत
Viral Video: मोबाईलच्या नादात जीवाशी खेळ! रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या तरुणाने उडवली सर्वांची झोप, VIDEO एकदा पहाच

अनुसया यांच्या घरासमोर गर्दीतून वाट काढत हे वानर आले. वानर आल्याचे पाहून सुरूवातीला सर्वजण घाबरले. पण या वानराचे कृत्य पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हे वानर अनुसया यांच्या पार्थिवाजवळ गेले. अनुसया यांच्या डोक्यावरील पदर काढून त्याने त्यांना न्याहाळले. अगदी एखाद्याच्या डोक्यावरून हात फिरवावा अशापद्धतीने या वानराने अनुसया यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्यांचा चषमा बाजूला काढला.

Viral Video: गर्दीतून वाट काढत तो आला, डोळे भरून पाहिलं अन्, आजीच्या अंत्यदर्शनाला वानराची उपस्थिती; कृती पाहून सारे चकीत
Viral Video: नवरी नटली गाण्यावर आजीबाईचा जबरदस्त डान्स,पोरीही झाल्या फेल; पहा VIDEO

अनुसया यांच्या नातेवाईकांनी देखील वानराला हटकले नाही. तो करत असलेले कृत्य ते एकटक पाहत राहिले. अनुसया यांचा चेहरा डोळे भरून पाहिल्यानंतर हा वानर रस्त्याच्या कडेला जाऊन बसला. त्यानंतर अनुसया यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत स्मशानभूमीपर्यंत हे वानर आले. अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत हजर राहिले. त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आले आणि नंतर निघून गेले. अनुसया यांचे पती मारुती यांचे २० वर्षापूर्वी निधन झाले होते. हा योगायोग की चमत्कार याची पंचक्रोशीत मोठी चर्चा आहे.

Viral Video: गर्दीतून वाट काढत तो आला, डोळे भरून पाहिलं अन्, आजीच्या अंत्यदर्शनाला वानराची उपस्थिती; कृती पाहून सारे चकीत
Viral Video: बाईsss इतकं प्रेम...! महाकुंभात सासू हरवली, सुनेचे रडून रडून हाल; अनोखा व्हिडिओ चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com