Pushkar jog :...तर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील; अभिनेता पुष्कर जोग जातीच्या प्रश्नावरून भडकला

Pushkar Jog Instagtram post: मराठी अभिनेता पुष्कर जोगच्या घरी सर्वेक्षण करण्यासाठी बीएमसी कर्मचारी आले होते. मात्र, त्यांच्या जातीवरील प्रश्नावर अभिनेता पुष्कर जोग चांगलाच भडकला.
Pushkar jog
Pushkar jogSaam tv

Pushkar Jog Instagtram post:

राज्यात मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणाचं काम काही कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे. यानुसार अभिनेता पुष्कर जोगच्या घरी सर्वेक्षण करण्यासाठी बीएमसी कर्मचारी आले होते. मात्र, त्यांच्या जातीवरील प्रश्नावर अभिनेता पुष्कर जोग चांगलाच भडकला. त्यानंतर पुष्कर जोगने सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

पुष्कर जोगने सोशल मीडियावर अनुभव शेअर केला आहे. पुष्कर जोग जातीच्या प्रश्नावरून भडकल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरीवर पोस्ट लिहित संताप व्यक्त केला आहे.

Pushkar jog
Pushkar jog Saam tv
Pushkar jog
Nick Jonas Performance: निक जोनसचा मुंबईत धमाकेदार परफॉर्मन्स, 'जीजू जीजू...' म्हणत फॅन्सचा कल्लोळ!

पुष्कर जोगने पोस्टमध्ये काय म्हटलंय?

पुष्कर जोगने पोस्ट करत म्हटलं की, 'काल बीएमसीच्या काही कर्मचारी.. माझ्या घरी आल्या आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाई माणूस नसते तर २ लाथ नक्कीच मारल्या असत्या'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका otherwise जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुष्कर जोगच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.

Pushkar jog
Sreela Majumdar Passes Away : अभिनेत्री श्रीला मजुमदार यांची कर्करोगाशी झुंज अपयशी, 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, अभिनेता पुष्कर जोगच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर, त्याने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याने 'जबरदस्त', 'मिशन पॉसिबल', 'बापमाणूस' अशा विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com