Prathamesh Parab ची #Realवाली लव्हस्टोरी, खऱ्या आयुष्यातली प्राजू कशी भेटली?; Kshitija Ghosalkar ने सांगितली आठवण

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Lovestory: क्षितीजाने प्रथमेशशिवायच प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. या फोटोशूटच्या माध्यमातून तिने प्रथमेश आणि तिची पहिली भेट कशी झाली? त्याचसोबत त्यांच्या ४ वर्षांच्या रिलेशनशीपच्या आठवणी तिने शेअर केल्या आहेत.
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Lovestory
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar LovestoryInstagram
Published On

Prathamesh Parab Wedding:

‘टाईमपास’ (Timepass Movie) चित्रपटाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला 'दगडू' अर्थात अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रथमेश परबच्या घरी सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. लवकरच तो त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत (Kshitija Ghosalkar) लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

अशातच त्यांनी प्री-वेडिंग फोटोशूट करण्यास सुरूवात केली आहे. पण क्षितीजाने प्रथमेशशिवायच प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. या फोटोशूटच्या माध्यमातून तिने प्रथमेश आणि तिची पहिली भेट कशी झाली? त्याचसोबत त्यांच्या ४ वर्षांच्या रिलेशनशीपच्या आठवणी तिने शेअर केल्या आहेत.

क्षितीजाने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्री-वेडिंग फोटोशूटमधील सुंदर फोटो शेअर केले आहे. या फोटोशूटसाठी क्षितीजाने अतिशय सिंपल लूक केला होता. तिने लाइट पर्पल कलरची कॉटनची साडी आणि पांढरा ब्लाऊज परिधान केला आहे. केसाची वेणी, कानात झुमके आणि हातामध्ये सिंपल घड्याळ असा लूक तिने केला होता. क्षितीजाचा हा साधेपणा सर्वांना प्रचंड आवडत आहे.

या फोटोशूटच्या माध्यमातून क्षितीजाने तिच्या आणि प्रथमेशच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. निसर्गाच्या सानिध्यात एका नदीच्या काठावर बसून तिने हे फोटोशूट केले आहे. कधी स्मित हस्य देताना, तर कधी पत्र वाचताना, तर कधी जुन्या आठवणींमध्ये रमलेली क्षितीजा या फोटोंमध्ये खूपच क्युट दिसत आहे.

क्षितीजाने हे फोटो शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन दिले आहे. 'गुंतले हृदय हे' असं आकर्षक कॅप्शन तिने दिले आहे. या पोस्टमध्ये तिने असे लिहिले आहे की, '4 वर्षांपूर्वी, "गुंतता हृदय हे" या एका फोटोसेरिजमुळे माझी आणि प्रथमेश परबची ओळख झाली. त्याला सिरीज आवडली. त्याने मेसेज करून भरभरून कौतुक केलं आणि पुढे आमचं हळूहळू बोलणं सुरू झालं.'

'बरं कपल प्री-वेडिंग वगैरे केलं जातं, निश्चित आम्ही पण करणार आहोत. पण ज्या फोटोशूटमुळे आमच्या प्रेमाची सुरुवात झाली. आज तिचं सीरिज रिक्रिएट करून प्रथमेशला डेडिकेट करावीशी वाटली. म्हणजे ड्युएट फोटोशूट असतंच पण आपल्या पार्टनरला डेडिकेट करणारं, त्याच्या विषयी प्रेम व्यक्त करणारं सोलो प्री वेडिंग फोटोशूट करायला काय बरं हरकत आहे? मग ठरवलं, करूया की, फक्त यावेळी लव्हस्टोरी आपली, #Realवाली', असे क्षितीजाने लिहिले आहे.

क्षितीजाने या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'बरं जुन्या सिरिजमध्ये होती 70 व्या शतकातील लव्हस्टोरी आणि अगदीच वेगळा विषय! त्याचा आमच्या लव्हस्टोरीशी तसा काहीच संबंध नाही. पण जरी आमची ओळख वर्च्युअली झाली तरीही आम्ही दोघेही बऱ्यापैकी ओल्ड स्कूल टाइपचं आहोत. या फोटोमधील पत्रासारखी, अनेक पत्र मी त्याच्यासाठी लिहिली. हस्ताक्षर छान यावं म्हणून खाडाखोड केलेली अनेक पत्रं, लिहिताना शाईने झालेली काळी निळी बोटं, कधी कधी लिहिता लिहिता आनंदाश्रूनीं किंवा त्याच्या आठवणींनी, डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी हळूच पुसलेले शब्द, माझ्या पाकिटामध्ये त्याचा नेहमी असणारा पासपोर्ट साइज फोटो (जो या पत्रामध्येही आहे)... अशा एक ना अनेक आठवणींनी हृदयाची कुपी पुन्हा एकदा सुगंधित झाली.'

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Lovestory
Kasammal Death : प्रसिद्ध अभिनेत्रीची निर्घृण हत्या, दारूड्या मुलानंच काठीने मरेपर्यंत मारले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com