Baloch Shooting: भूमिकेसाठी काहीही...! तब्बल ५० डिग्री तापमानात प्रवीण तरडेंनी शूट केला ‘बलोच’

पडद्यावर हे वास्तव खरेखुरे भासावे, यासाठी चित्रपटात नैसर्गिकतेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.
Pravin Tarde Baloch Movie Shoot In 50 Degree
Pravin Tarde Baloch Movie Shoot In 50 DegreeSaam Tv
Published On

Pravin Tarde Baloch Movie Shoot In 50 Degree: पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अंगावर शहारा आणणारे ट्रेलर प्रदर्शित झाले. ट्रेलरवरून याचे चित्रीकरण किती आव्हानात्मक असेल, याचा आपण निश्चितच अंदाज बांधू शकतो.

Pravin Tarde Baloch Movie Shoot In 50 Degree
Bhojpuri Actress Father Passed Away: भोजपुरी अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

पडद्यावर हे वास्तव खरेखुरे भासावे, यासाठी चित्रपटात नैसर्गिकतेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. मेकअप, पोशाख ते अगदी चित्रीकरण स्थळापर्यंत सगळ्याच गोष्टी नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘बलोच’चे चित्रीकरण हे जैसलमेरच्या रखरखीत उन्हात ५० डिग्री तापमानात शूटिंग झाले आहे.

Pravin Tarde Baloch Movie Shoot In 50 Degree
Devendra Fadnavis On Salman Khan Security Statement: मुंबईपेक्षा सुरक्षित जागा नाही...; म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी सलमानच्या सुरक्षेवर केले भाष्य...

या अनुभवाबद्दल प्रविण तरडे म्हणतात, “महाराष्ट्रातील ४० डिग्री तापमानात आपली अवस्था खराब होते. तिथे ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले. या रखरखत्या उन्हात चित्रीकरण करणे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. आमची ४०-५० जणांची टीम होती. सीन चित्रित झाल्यावर आम्ही तंबूत जायचो, मात्र तिथेही उन्हाच्या झळा यायच्या. ”

चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलताना प्रविण तरडे म्हणतात, “आम्हाला भीती होती की, चित्रीकरणादरम्यान काही शारीरिक अडचणी येऊ नयेत आणि सुदैवानं असं काहीही झालं नाही. सगळं सुरळीत पार पडलं. एक मात्र आवर्जून सांगावसं वाटतं, ते म्हणजे या रखरखत्या उन्हात मराठे कसे लढले असतील, याचा अंदाज आम्हाला इथे आला. खरंतर पानिपतचे युद्ध हा मराठ्यांचा पराभव नसून ही मराठ्यांची विजयगाथा आहे आणि हेच आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे.” (Marathi Actors)

Pravin Tarde Baloch Movie Shoot In 50 Degree
Khillar Movie Poster Launch: बैलगाडा शर्यतीचा थरार.. रिंकू सोबत दिसणार ललित प्रभाकरचा गावरान अंदाज, सर्वांना उत्सुकता

अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत 'बलोच' या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत. तर महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे, जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड निर्माते असून पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार हे सहनिर्माते आहेत. 'बलोच'मध्ये प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, अमोल कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या वितरणाचे काम फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांनी पाहिले आहे. (Marathi Film)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com