Devendra Fadnavis On Salman Khan Security Statement: मुंबईपेक्षा सुरक्षित जागा नाही...; म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी सलमानच्या सुरक्षेवर केले भाष्य...

Devendra Fadnavis On Salman Khan Security: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सलमानच्या सुरक्षेबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना ही महत्वाची अपडेट दिली आहे.
Devendra Fadnavis On Salman Khan Security Statement
Devendra Fadnavis On Salman Khan Security StatementSaam Tv

Devendra Fadnavis On Salman Khan Death Threat: बॉलिवूडचा दबंग सेलिब्रिटी सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कधी आपल्या चित्रपटामुळे तर कधी, बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीमुळे तो सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सलमानला मेलच्या माध्यमातून कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमकी आली होती.

सलमानला मिळालेल्या धमकीमुळे मुंबई पोलिसांकडून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सलमानच्या सुरक्षेबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना ही महत्वाची अपडेट दिली आहे.

Devendra Fadnavis On Salman Khan Security Statement
Rinku Rajguru-Lalit Prabhakar Movie Poster: बैलगाडा शर्यतीचा थरार.. रिंकू सोबत दिसणार ललित प्रभाकरचा गावरान अंदाज, सर्वांना उत्सुकता

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत हे वक्तव्य केलं आहे, काही वर्षांपूर्वी सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. या प्रकरणात त्याची निर्दोश सुटका झाल्यानंतर अनेकदा बिश्नोई समाजाने त्याच्याकडे माफी मागण्याची मागणी केली होती. बिश्नोई समाजात काळवीटाला पवित्र मानले जाते. त्याने माफी न मागितल्यामुळे सलमान खानला बिश्नोई गँग वारंवार जीवे मारण्याची धमकी देत आहे.

Devendra Fadnavis On Salman Khan Security Statement
TDM Film On Ajit Pawar: 'टीडीएम'ला स्क्रीन न मिळणं अत्यंत दुर्दैवी, अजित पवारांनी मराठी चित्रपटांबद्दल व्यक्त केली खंत

कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमकी आणि सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता या प्रकरणावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून सलमानच्या सुरक्षेच्या तयारीबाबत अपडेट दिले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सलमान खानची सुरक्षा सर्वोच्च पातळीची आहे. त्याला मुंबईत किंवा भारतात कुठेही फिरायला हरकत नाही. मला वाटतं मुंबईपेक्षा सुरक्षित जागा नाही.” (Bollywood Actor)

मुंबई पोलिसांनी सलमान खानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा दिली आहे. या अंतर्गत सलमान खान 11 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात सतत फिरत असतो. या सुरक्षा कर्मचार्‍यांपैकी त्यांच्यासोबत 2 कमांडो आणि 2 वरिष्ठ पोलिस अधिकारी सदैव तैनात असतात.

सलमानच्या या वक्तव्यावरून कंगना रनौतचे वक्तव्य देखीलसमोर आले होते. कंगनाच्या मते, सलमान खानला काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे संरक्षण मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com