Mantarlelya Shabdbanat: काव्य आणि सुरांचा संगम! 'मंतरलेल्या शब्दबनात’ची सुरेल मैफिल; ग्रेस-आरती प्रभूंच्या कवितांचा सोहळा

Mantarlelya Shabdbanat : विलेपार्ल्यात ‘मंतरलेल्या शब्दबनात’ काव्यमैफिल रंगली. ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या कवितांचे सादरीकरण, सुरेल गीतांनी कार्यक्रमाला रंगत आली. तसेच रसिकांची मोठी उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद.
Mantarlelya Shabdbanat
Mantarlelya ShabdbanatSaam Tv
Published On

Mantarlelya Shabdbanat : विलेपार्ले येथे काव्य आणि संगीताचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मंतरलेल्या शब्दबनात’ ही विशेष काव्यमैफिल मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडली. विलेपार्ले येथीलमास्तर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि चोखंदळ रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या कार्यक्रमाची संहिता विनय परांजपे यांनी प्रभावीपणे मांडली होती. सुसंवादक विघ्नेश जोशी यांनी आपल्या खास शैलीत कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या निवडक कवितांचे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणातून या दोन्ही कवींच्या साहित्याची गहिरी भावविश्वे रसिकांपर्यंत पोहोचली. प्रत्येक कवितेनंतर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता.

Mantarlelya Shabdbanat
Dhurandhar 2: 'धुरंधर: द रिव्हेंज'चा क्लायमॅक्स बदलला! 'जसकिरत'ला मिळाला नवा शेवट

कार्यक्रमाला सुरेल रंगत देण्याचे काम गायक नचिकेत देसाई आणि धनश्री देशपांडे यांनी केले. त्यांनी सादर केलेल्या गीतांनी काव्याला संगीताची जोड मिळाली आणि संपूर्ण सभागृह भारावून गेले. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांनी केले होते, ज्यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी झाले. हा सोहळा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारआणि सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच संचालक श्रीराम पांडे आणि कार्यक्रम अधिकारी मिलिंद बिर्जे यांनीही या उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Mantarlelya Shabdbanat
Valmiki Ramayan: बॉलीवूडमध्ये मोठी टक्कर; रणबीर कपूरच्या 'रामायण'पूर्वी 'वाल्मिकी रामायण' होणार प्रदर्शित

कार्यक्रमाच्या प्रारंभी अजय पाटील आणि अमित टिल्लू यांच्या हस्ते कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुमारे अडीच तास चाललेल्या या काव्यमैफिलीला उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकूणच, ‘मंतरलेल्या शब्दबनात’ हा कार्यक्रम काव्य, संगीत आणि सादरीकरण यांचा सुंदर संगम ठरला. अशा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमांमुळे मराठी साहित्य आणि काव्यपरंपरेला नवी ऊर्जा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com