Manoj Bajpayee Retirement: मनोज वाजपेयी सिनेसृष्टीला अलविदा करणार? निवृत्तीनंतरचा सांगितला सविस्तर प्लान

Manoj Bajpayee Talks About His Retirement Plans: नुकतंच अभिनेत्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्याने निवृत्तीबाबत चाहत्यांना एक महत्वाची हिंट दिली.
Manoj Bajpayee Talks About His Retirement Plans
Manoj Bajpayee Talks About His Retirement Plans Saam Tv
Published On: 

Manoj Bajpayee Reveals His Retirement Plan: ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून मनोज वाजपेयी सर्वाधिक प्रकाश झोतात आला. मनोज वाजपेयी नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळताच अभिनेत्याने एक महत्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. नुकतंच अभिनेत्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्याने निवृत्तीबाबत चाहत्यांना एक महत्वाची हिंट दिली.

Manoj Bajpayee Talks About His Retirement Plans
Khatron Ke Khiladi 13 : ‘या’ तारखेपासून सुरू होणार ‘खतरों के खिलाडी 13', अंगाचा थरकाप उडणाऱ्या टास्कला सामोरे जाणार स्पर्धक

नुकतेच मनोज वाजपेयीने एका मुलाखतीत चाहत्यांना निवृत्तीची हिंट दिली, हिंट देताना मनोज वाजपेयी म्हणतो, “मला मुंबईतल्या घरात राहायचे नाही. मी आधीच एका डोंगराळ भागात निसर्गरम्य ठिकाणी जागा घेऊन ठेवली आहे. मला तिथे एक छोटंसं घर बांधायचं असून माझं म्हतारपण मुंबईत घालवायचं नाही. मुंबई हे शहर माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलांसाठी हे मुंबई शहर आहे.” असं देखील मनोज वाजपेयी स्वत: म्हणाला...

अभिनेत्याने यापूर्वी देखील त्याच्या निवृत्तीबाबत चाहत्यांना संकेत दिलेय. मनोज वाजपेयीने कर्ली टेल्स सोबत बोलताना सांगितले, “ज्या दिवशी मला कामाचं समाधान वाटेल, त्याच दिवशी मी अभिनय जगतातून रिटायर्डमेंट घेईल, मात्र मला नेहमीच माझं काम करायला खुप आवडतं, त्यासाठी मी नेहमीच उत्सूक आहे, असे देखील अभिनेत्याने स्पष्ट केले.”

Manoj Bajpayee Talks About His Retirement Plans
Subhedar Teaser: स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा ‘सुभेदार’मधून उलगडणार, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

काही दिवसांपुर्वी मनोजने, “आपण कधीही राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बिहार दौऱ्यादरम्यान मनोजने लालू प्रसाद यांची त्यांच्या १०, सर्कुलर रोड येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे अभिनेता राजकारणात सक्रिय प्रवेश करणार का?,अशी चर्चा सुरू होती. मात्र मनोजने होत असलेल्या सर्व चर्चांचं खंडण केलंय.”

Manoj Bajpayee Talks About His Retirement Plans
Mohammad Zakir Hussain Death: ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ फेम गायकाचे निधन, बिसापूर येथे घेतला अखेरचा श्वास..

मनोज वाजपेयी याला त्याच्या सिनेकारकिर्दित उत्कृष्ट अभिनयासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मनोजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच त्याचा ‘सिर्फ एक बंदा कोफी है’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना त्याचा तो चित्रपट फारच आवडला आहे. मनोजने आपल्या फिल्मी कारकिर्दित, गँग्ज ऑफ वासेपुर, द फॅमिली मॅन सह अनेक कलाकृतीत दमदार भूमिका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.