Monali Thakur Concert Controversy : कॉन्सर्टमध्ये मोनाली ठाकूरसोबत चाहत्याचं गैरवर्तन, प्रायव्हेट पार्टकडे इशारा करत केली कमेंट

Monali Thakur News : लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान गर्दीत उभ्या असलेल्या एका चाहत्याने गायिका मोनाली ठाकूर हिच्या प्रायव्हेट पार्टवर अश्लील कमेंट केली. ही घटना घडताच अभिनेत्रीने शोबंद थांबवला.
Monali Thakur News : कॉन्सर्टमध्ये मोनाली ठाकूरसोबत चाहत्याचं गैरवर्तन,  प्रायव्हेट पार्टकडे इशारा करत केली कमेंट
Monali Thakur Concert ControversySaam Tv

लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायकांसोबत गैरवर्तन घडण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गायक कैलाश खेर आणि गायिका सुनीधी चौहानसोबत लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान विचित्र प्रकार घडला होता. आता त्यानंतर पुन्हा एका बॉलिवूड सिंगरसोबत कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करण्यात आले आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून गायिका मोनाली ठाकूर आहे. घडलेल्या प्रकारामुळे अभिनेत्रीने संताप व्यक्त केलेला आहे.

Monali Thakur News : कॉन्सर्टमध्ये मोनाली ठाकूरसोबत चाहत्याचं गैरवर्तन,  प्रायव्हेट पार्टकडे इशारा करत केली कमेंट
PHOTOS- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 'धर्मवीर २'चं पोस्टर लॉन्च, रिलीज डेटही केली जाहीर

मीडिया रिपोर्टनुसार, मोनाली ठाकूर २९ जून रोजी भोपाळमधील सेज विद्यापीठात ती परफॉर्म सादर करण्यासाठी आली होती. या कॉन्सर्टमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणावर होती. कॉन्सर्ट दरम्यान गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तिच्या प्रायव्हेट पार्टवर काही तरी अश्लील कमेंट केली. ही घटना घडताच अभिनेत्रीने शोबंद थांबवला आणि तिच्या टीमला ती काहीतरी म्हणाली, त्यानंतर ती अचानक संतापली.

मोनाली ठाकूर घडलेल्या प्रकाराबद्दल म्हणाली, "काही लोक गर्दीत लपून कमेंट करतात. ही घटना योग्य नाही. या माणसाने केलेली अश्लील कमेंट त्याच्या कायम लक्षात राहावी, त्याला धडा मिळावा यासाठी मी या प्रकरणावर आवाज उठवत आहे. या मुद्द्यावर बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं. आता भर कॉन्सर्टमध्ये हा प्रकार घडल्यामुळे मी जाहीरपणे बोलली."

Monali Thakur News : कॉन्सर्टमध्ये मोनाली ठाकूरसोबत चाहत्याचं गैरवर्तन,  प्रायव्हेट पार्टकडे इशारा करत केली कमेंट
Payal Malik Evicted : ...म्हणून पायल मलिक पडली बिग बॉसच्या घराबाहेर, स्वत:च VIDEO शेअर करत सांगितले कारण

कॉन्सर्टमध्ये मोनाली पुढे म्हणाली, "मला सर्वांना सांगायचं आहे, जर असा प्रकार कोणासोबत घडला तर अन्यायाविरूद्ध आवाज उठवा." मीडिया रिपोर्ट्सनुसार, "आम्ही फक्त मोनालीच्या डान्स मुव्हजवर कमेंट करत होतो. तिला काहीही आक्षेपार्ह म्हटलं नाही." मोनालीवर कमेंट करणाऱ्या तरुणाने घडलेल्या घटनेवर असं स्पष्टीकरण दिलं.

Monali Thakur News : कॉन्सर्टमध्ये मोनाली ठाकूरसोबत चाहत्याचं गैरवर्तन,  प्रायव्हेट पार्टकडे इशारा करत केली कमेंट
Rapper Naezy News : "आयुष्य बरबाद झालं होतं"; 'गली बॉय'च्या शुटिंगवेळी कुठे होता? रॅपर नॅझीने केला मोठा खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com