Mahesh Manjrekar's first wife Deepa Mehta Passes Away: महेश मांजरेकर यांच्या आयुष्यात दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचे निधन झाले असून यामुळे मांजरेकर कुटुंबात शोककळा पसरली आहे. दीपा मेहता या जरी सिनेसृष्टीपासून दूर राहिल्या असल्या तरी त्यांचा स्वभाव, साधेपणा आणि कुटुंबाशी असलेले नाते यामुळे त्या सर्वांना जवळच्या वाटत होत्या.
महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचा सत्या मांजरेकरचा हा मुलगा आहे . सत्या स्वतः अभिनेता असून अलीकडेच त्याने काही चित्रपटांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सत्याने सोशल मीडियावर आईच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
दीपा यांच्या निधनाची माहिती सत्या मांजरेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्याने एक भावनिक पोस्ट लिहून आईच्या आठवणींना उजाळा दिला. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “तू माझ्यासाठी केवळ आई नव्हतीस, तर माझा आधार, माझं सामर्थ्य होतीस. माझ्या प्रत्येक यशात तुझा वाटा होता. आता पुढे मी जे काही करेन त्यामागे तुझं आशीर्वादाचं कायम असेल.” त्याच्या या शब्दांनी चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले.
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सत्या आणि महेश मांजरेकर यांना धीर देणारे संदेश दिले आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीदेखील या दुःखद प्रसंगी श्रद्धांजली वाहिली आहे. महेश मांजरेकर यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. दिग्दर्शक, अभिनेता, लेखक म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. पण वैयक्तिक आयुष्यातील हा मोठा धक्का त्यांच्यासाठी अतिशय वेदनादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.