Gaurav More: फ्लिटरपाड्याच्या गौरवची पहिल्यांदाच लंडन वारी; 'त्याने करुन दाखवल', चाहत्यांची खास कमेंट

लंडनमध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तूस्थळाला गौरवने भेट दिली. घराबाहेरील फोटो शेअर करत त्याने महामानव बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे.
Gaurav More London Shooting  Image
Gaurav More London Shooting ImageInstagram/ @im_gaurav_more20
Published On: 

मुंबई: कलर्स मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातले बरेच कलाकार आपल्या विनोदी शैलीत आणि प्रत्येकाच्या हटक्या नावातील ओळखीने प्रेक्षकांना हसवत असतात. प्रत्येकाची आपल्या चाहत्यांना हसवण्याची स्टाईल खूप वेगळ्या पद्धतीने आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे गौरव मोरे होय. (Gaurav More)

'आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा' हा गौरवचा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालाय. आपल्या खास विनोदी शैलीने, आपल्या हसवण्याच्या पंचने साऱ्यांचाच लाडका तो ठरला आहे. त्याने मराठी चित्रपटासह मालिका, नाटक आणि हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Gaurav More London Shooting  Image
Har Har Mahadev: पुन्हा एकदा दाक्षिणात्य सुपरस्टार मराठी चित्रपटाच्या प्रेमात, टीमने घेतली 'या' कलाकाराची भेट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील अनेक कलाकार सध्या परदेशवारी करताना दिसत आहेत. त्यात गौरव मोरेचाही क्रमांक अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. गौरव नव्या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. आपल्या चाहत्यांसोबत त्याने लंडनवारीतील (London) काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. (Maharashtrachi Hasyajatra)

'माझृीया प्रियाला प्रित कळेना' मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले असून या मालिकेत त्याने विनोदी पात्र साकारले होते. त्याच दरम्यान त्याचे वडिल अल्पशा आजाराने त्रस्त होते, पण कालांतराने त्यांचे निधन झाले. तरीही त्याने आपल्या कामावर त्याचा काहीही परिणाम पडू न देत चाहत्यांना हसवण्याचे काम अविरत चालू ठेवले.

Gaurav More London Shooting  Image
Adipurush Controversy: आदिपुरुषच्या दिग्दर्शकाला मिळाले अनोखे गिफ्ट, किंमत वाचून व्हाल अवाक

सिनेमाच्या शूटिंग निमित्त गेल्या काही महिन्यांत बरेच कलाकार लंडनवारी करुन आले आहेत. प्राजक्ता माळी, हृता दुर्गुळे, पूजा सावंत, अलका कुबल,(Marathi Actress) संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्त्ववादी, ऋषिकेश जोशी (Marathi Actors) यांसारखे अनेक कलाकार लंडनमध्ये गेले होते.

पण फिल्टपाड्याच्या गौरव मोरेने लंडनमध्ये जाऊन आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच कारणही तसेच खास आहे. लंडनमध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तूस्थळाला गौरवने भेट दिली. घराबाहेरील फोटो शेअर करत त्याने महामानव बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे.

Gaurav More London Shooting  Image
Siddharth Jadhav: सिद्धार्थने केला दादा कोंडकेंचा लूक; 'चाहते पाहताच म्हणतात...'

शेअर पोस्टमध्ये कॅप्शन लिहिले की, "भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे. या भराऱ्या आमुच्या, ही पाखरांची वंदना. तुमच्यामुळे आज आमच अस्तित्व आहे. आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा", असे म्हणत गौरवने बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे. 'बऱ्याच कलाकारांनी परदेशवारी केली पण गौरवसारखा कोणी गेला नाही. मी जे केलं तोच मी खरा आहे हे त्याने करुन दाखवले.' असे म्हणत त्याच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले.

लंडनमध्ये शुटींग झालेल्या सिनेमात अभिनेते भरत जाधव, निखिल चव्हाण सह गौरव माने प्रमुख भूमिकेत आहेत. गौरवनं जवळपास 15 दिवस लंडनमध्ये सिनेमाचं शुटींग उरकल असून तो आता भारतात येण्यासाठी परतला आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com