Har Har Mahadev: पुन्हा एकदा दाक्षिणात्य सुपरस्टार मराठी चित्रपटाच्या प्रेमात, टीमने घेतली 'या' कलाकाराची भेट

चित्रपटाचे निमित्ताने सुबोध भावे आणि टीमने तेलगू सुपरस्टार नागार्जुनची भेट घेतली आहे. सुबोधने काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Har Har Mahadev Poster Out Image
Har Har Mahadev Poster Out Image Instagram/ @subodhbhave
Published On

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कारकिर्दीबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवभक्तांना ठाऊक व्हावे यासाठी झी स्टूडिओज निर्मित 'हर हर महादेव' चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महाराजांचे सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमावर भाष्य करण्यात आले आहे. (Marathi Movie)

शिवभक्त या चित्रपटाकडे ऐतिहासिक चित्रपट म्हणून पाहत आहे. हा चित्रपट एकूण पाच भाषेंमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड हिमांशू झा, मोहन जोशी, शरद पोंक्षे सह आदी दिग्गज कलाकारमंडळीची फौज दिसणार आहे.

Har Har Mahadev Poster Out Image
Adipurush Controversy: आदिपुरुषच्या दिग्दर्शकाला मिळाले अनोखे गिफ्ट, किंमत वाचून व्हाल अवाक

चित्रपटाचे सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन चालत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाचे निमित्ताने सुबोध भावे आणि टीमने तेलगू सुपरस्टार नागार्जुनची (Nagarjuna) भेट घेतली आहे. सुबोध भावेने सर्व फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

पोस्टच्या खाली कॅप्शन लिहिले की, आज 'हर हर महादेव' चित्रपट सर्वदूर पोहोचवण्याच्या निमित्ताने, हैद्राबाद येथे तेलगू सुपरस्टार नागार्जुन सर यांची भेट घेतली. सोबतच यावेळी चित्रपटाचे तेलगू भाषेतील पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. यावेळी सुबोध सोबत चित्रपटाची अन्य टीमही उपस्थित होती.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुबोध भावे म्हणतो, 'समस्त तेलगू बंधू भगिनींना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित असलेला चित्रपट पाहण्याचे आवाहन, शिव विचार आत्मसात करण्याचे आवाहन, त्यांचे कार्य जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. स्वत: नागार्जुन ही छत्रपतींच्या चरित्र्याने प्रभावित झाल्याचेही सांगितले. "हर हर महादेव" च्या संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही त्यांना सिंहासनारूढ शिवछत्रपतींची मूर्ती भेट म्हणून दिली आहे.

Har Har Mahadev Poster Out Image
Rakhi Sawant: दिवाळीनिमित्त राखीने केली नौटंकी; चाहते म्हणतात, 'ही तर दुसरी उर्फीच...'

तसेच पुढे सुबोध भावे म्हणतो, मराठी चित्रपट सर्वदूर नेण्याच्या प्रयत्नाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या व लवकरच "हर हर महादेव" चित्रपट तेलगू भाषेत पाहणार असल्याचं सांगितलं. नागार्जुन सर आपले आमच्या तमाम शिव - भक्तांतर्फे मनापासून आभार मानतो. येत्या दिवाळीत सिनेमाप्रेमींसाठी हा खास चित्रपट म्हणता येईल. येत्या दिवाळीत हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com