Better half chi love story: प्रेम, गोंधळ आणि सस्पेन्सचा हलकाफुलका तडका; 'बेटर हाफची लव्हस्टोरी'चा टिझर प्रदर्शित

Better Half Chi Love Story: ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Better Half Chi Love Story
Better Half Chi Love Story
Published On

Better Half Chi Love Story: सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचा जोरदार शिडकावा उडवून गेला आहे. टीझरच्या पहिल्याच फ्रेमपासून प्रेक्षकांची पकड घेणारी ही कथा, सुबोध भावेच्या पात्राभोवती फिरणारी आहे, ज्याची पत्नी गेली असली, तरी तिचा वावर त्याला तरीही जाणवतोय.

या भासातून मुक्त होण्यासाठी तो करत असलेल्या प्रयत्नांमध्ये हास्य आणि रहस्याची भन्नाट मिसळ आहे. एकीकडे टीझरमध्ये हलकीफुलकी विनोदी झलक दिसते, तर शेवटी ऐकू येणारा एक गंभीर प्रश्न, 'त्यादिवशी एक्साक्टली काय घडलं?' प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची गुंफण तयार करतो. या रहस्याची उकल मात्र २२ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहातच होणार आहे.

Better Half Chi Love Story
Wrestling star Passes Away: जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केलं आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या सिनेमाचे निर्माते रजत अग्रवाल असून, साजन पटेल आणि अमेय नरे यांनी संगीत दिलं आहे. सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

Better Half Chi Love Story
Saiyaara Box Office Collection: 'सैयारा'ची आठवड्याभरात छप्परफाड कमाई; सातव्या दिवशी केला इतक्या कोटींचा गल्ला

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, “ही गोष्ट खऱ्या अर्थाने आजच्या प्रेक्षकांना जोडणारी आहे. विनोदी बाजूसोबत थोडं वेगळं काही सांगायचा आमचा प्रयत्न आहे, जो सर्व वयोगटांना भावेल.'' गूढ, विनोद, आणि प्रेम यांचा उत्तम मेळ असलेला ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ २२ ऑगस्टला सिनेमागृहात दाखल होणार असून टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com