
K. Viswanath Passes Away: तेलगू-हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक कासीनाधुनी विश्वनाथ (K. Viswanath) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. हैदराबाद (Hyderabad) मधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Falke Award) गौरविण्यात आले होते.
केवळ तेलुगु चित्रपटातच नव्हे तर तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांचे नाव बरेच गाजलेले होते, 2016 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार तर 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विश्वनाथ यांच्या सहा दशकाच्या सिने कारकिर्दीत पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर 10 फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविले आहे.
के विश्वनाथ यांनी तेलुगू, हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये 50 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते तर, ते तमिळमधील 'यारादी नी मोहिनी' चित्रपटातील विशेष भूमिकेसाठी आजही ओळखले जातात. के. विश्वनाथ यांचा चित्रपट ५९ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून ठरला होता. कमल हसन अभिनीत 'स्वाथिमुथ्यम' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला हा सन्मान मिळाला होता.
के. विश्वनाथ यांचा थोडक्यात जीवनप्रवास
19 फेब्रुवारी 1930 साली आंध्र प्रदेशच्या गुंटुरमध्ये जन्म झाला होता. के. विश्वनाथ यांनी सिनेसृष्टीत 'तपस्वी' या नावाने आपली ओळख कमवली. आंध्र विद्यापीठातून के. विश्वनाथ यांनी विज्ञान शाखेची पदवी मिळवली होती. विश्वनाथ यांनी साऊंड आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. विश्वनाथ यांनी तब्बल 55 चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर 43 चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले आहे. 1965 साली आत्मा गोवरवम या चित्रपटासाठी त्यांना नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.