TDM: दमदार शरीरयष्टी अन् हातात टॉवेल, 'टीडीएम'च्या पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

पुन्हा एकदा चित्रपटाचा संभ्रमात पाडणारा पोस्टर समोर आला असून चित्रपटात नेमकं कोण मुख्य भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
TDM Poster
TDM PosterSaam Tv
Published On

TDM Poster: राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, आगळावेगळा विषय हाताळणाऱ्या ‘टीडीएम’ची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, कारण येत्या २८ एप्रिल २०२३ ला हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपटाच्या पोस्टरने ही उत्सुकता काही कमी होऊ दिलेली नाही. पुन्हा एकदा चित्रपटाचा संभ्रमात पाडणारा पोस्टर समोर आला असून चित्रपटात नेमकं कोण मुख्य भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

TDM Poster
Aishwarya Bachchan Viral Video: बोलके डोळे अन् ग्लॅमरस अंदाज, मिस वर्ल्डचा 'तो' लूक चाहत्यांना आजही करतो घायाळ ! पाहा व्हिडिओ

ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारे भाऊराव कऱ्हाडे 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या यशानंतर कॉमेडी जॉनर घेऊन आले आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मिती अशी दुहेरी धुरा त्यांनी पेलवली आहे. 'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत तर निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित 'टीडीएम' हा दर्जेदार विषय २८ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

TDM Poster
Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा प्रकरणाला नवं वळण; मृत्यूआधी शिझानच्या रुममध्ये गेलेली तुनिषा...

वास्तविकतेचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाच्या मुख्य नायकाचा चेहरा अद्याप प्रेक्षकांसमोर आलेला नाही. त्यामुळे चित्रपटात कोण कोण असणार याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. मात्र जास्त विलंब न करता काही दिवसातच याचाही उलगडा होणार आहे. चित्रपटाची कथा नेमकी कुठे वळण घेणार यातही अद्याप दुमत आहे, त्यामुळे चित्रपटात विशेष असे काय असणार याचा अंदाज लागत नाही. या चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशनची जबाबदारी UFO Movies सांभाळत आहे.

TDM Poster
Shah Rukh Khan: शाहरुखने बाल्कनीत जाण्यामागील गुपित उलगडलं, वडिलधाऱ्यांनी दिलेली 'ही' शिकवण विसरला नाही...

'चित्राक्ष फिल्म्स' आणि स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' या कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलली आहे. चित्रपटाचा पोस्टर पाहून रसिक प्रेक्षकांना २८ एप्रिल २०२३ ची उत्सुकता लागून राहिली असेल, यांत शंकाच नाही. तर लवकरच हा सिनेमा मोठया पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com