Famous Actor Wedding : शुभ मंगल सावधान! लोकप्रिय अभिनेता मेघन प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकला, पाहा VIDEO

Meghan Jadhav & Anushka Pimputkar Wedding : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Meghan Jadhav & Anushka Pimputkar Wedding
Famous Actor WeddingSAAM TV
Published On
Summary

'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता लग्न बंधनात अडकला आहे.

अभिनेता मेघन जाधवने अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.

मेघन आणि अनुष्का खूप वेळापासून एकमेकांना डेट करत होते.

मराठी मनोरंजनसृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय जोडी नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता मेघन जाधवनेने (Meghan Jadhav) अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरसोबत (Anushka Pimputkar ) आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत. मेघन आणि अनुष्का अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. अखेर 16 नोव्हेंबरला यांचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाला मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली.

अनुष्का-मेघन लव्ह स्टोरी

मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांची मैत्री 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवर झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. यांनी थाटामाटात लग्न केले. केळवण, साखरपुडा, मेहंदी, हळद, संगीत सर्व लग्नाचे कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडले. त्यांच्या लग्नाला 'रंग माझा वेगळा'ची टीम पाहायला मिळाली. मेघन आणि अनुष्का अडीच वर्षे एकमेकांना डेट करत होते.

लग्नातील लूक

मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकरने लग्नात पारंपरिक लूक केला होता. दोघेही खूप आनंदी आणि सुंदर दिसत होते. अनुष्काने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती. लूकला मॅचिंग मेकअप तिने केला. गळ्यात, कानात, हातात सुंदर दागिने, नाकात नथ असा पारंपरिक लूक तिने केला. तर मेघनने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली.

वर्कफ्रंट

मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर दोघांचेही अभिनय क्षेत्राची कनेक्शन आहे. मेघन जाधव सध्या 'लक्ष्मी निवास' या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत झळकला आहे. त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. त्यांनी मालिकेत 'जयंत' हे पात्र साकारले आहे. तर अनुष्का पिंपुटकर 'लग्नानंतर होईलच प्रेम' होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे. यात तिने नंदिनी-काव्याच्या लहान बहिणीची भूमिका साकारली आहे.

Meghan Jadhav & Anushka Pimputkar Wedding
De De Pyaar De 2 Collection : बॉक्स ऑफिसवर प्रेमाची जादू! अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे 2'नं वीकेंडला कमावले 'इतके' कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com