'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala ) मालिका प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत साहेबरावांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यापासून सगळीच गणिते बदलली आहेत. सरकार - सानिका आणि संपूर्ण धुमाळ कुटुंब आप्पांची प्रकृती कशी लवकरात लवकर बरी होईल यासाठी प्रयत्नात आहेत. पण हे सगळं घडत असताना सरकार मात्र सानिकाची पुरेपूर काळजी घेतो आहे की, तिला त्या गावात, घरात एकटे वाटणार नाही. तो सानिकाला खुश ठेवण्याचे बरेच प्रयत्न देखील करत आहे.
साहेबरावांनी फॅक्टरी बंद केल्यानंतर कळशी गावातील गावकरी बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांना दोघेही गावात नकोसे झाले आहेत. संपूर्ण कळशी गाव सरकार सानिकाच्या विरोधात उभे आहे. सरकारच्या घरच्यांना धक्का बसतो जेव्हा सई कमलला सांगते, पूर्ण गावानं कुटुंबाला वाळीत टाकलय. लाइट, पाणी, किराणा सगळ बंद केलंय.
सरकारच्या घरात अजून सानिकाला सगळ्यांनी स्वीकारलं नाहीये. सईच्या बोलण्यात येऊन कमल अजूनही सानिकाला विरोधात आहे. लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी बाबू आणि विभा सरकार सानिकाला गपचूप प्लान करून एका ठिकाणी घेऊन जाण्याचे ठरवतात. आता सईला हे कळताच व्हॅलेंटाईन स्पॉइल करण्यासाठी सई काय डाव रचणार हे कळेल. तर दुसरीकडे गावाने वाळीत टाकले आहे, हे सरकार सानिकाला कळल्यावर त्यांना खूप अस्वस्थ वाटते. सरकार - सानिका दोघे घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा करतात आणि मार्ग काढायचे ठरवतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.