Sonalee Kulkarni Photo: सोनालीचे फोटोपाहून कुशलची भन्नाट कमेंट चर्चेत; म्हणतो, तुझे फोटो पाहून...

Kushal Badrike's Comment On Sonali Kulkarni Photos: सोनाली कुलकर्णी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच तिच्या एका फोटोशूटवर अभिनेता कुशल बद्रिकेने कमेंट केली आहे.
Kushal Badrike's Comment On Sonali Kulkarni Photos
Kushal Badrike's Comment On Sonali Kulkarni PhotosInstagram
Published On

Kushal Badrike's Comment On Sonali Kulkarni Photos: मराठी सिनेसृष्टीत अप्सरा म्हणून सर्वत्र फेमस झालेली सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोनाली नेहमीच चाहत्यांसोबत खास अंदाजातील फोटो शेअर करते. तिच्या फोटोंवर अनेकदा चाहते किंवा सेलिब्रिटीही तिच्या फोटोंवर कमेंट करतात. सोनाली कुलकर्णी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच तिच्या एका फोटोशूटवर अभिनेता कुशल बद्रिकेने कमेंट केली आहे.

Kushal Badrike's Comment On Sonali Kulkarni Photos
MC Stan's Cricket With Sachin: रॅपर एमसी स्टॅन अन् सचिन तेंडुलकरने लुटला क्रिकेटचा आनंद; व्हिडिओ व्हायरल

सोनालीने नुकतेच चाहत्यांसोबत एक निळ्या रंगातील ड्रेसमध्ये फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. सोनालीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती स्वच्छंदी पणे काही पोज देत फोटो शेअर केले. आनंदाच्या ओघात शेअर केलेल्या फोटोंवर तिने “मैंने अपने आँचल से आसमाँ पर बादल कोरें हैं, कोई शक़ हो गर तो इस नीले रंग से पूछ लेना” हे हिंदी वाक्य कॅप्शन देत शेअर केले.

सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोवर कुशल बद्रिकेने मिश्किल भाषेत मजेशीर कमेंट केली आहे. ‘मुळात तुझे फोटो इतके भारी येतातच कसे? खूपच मस्त’ अशी कमेंट कुशल बद्रिकेने सोनालीच्या फोटोवर केली आहे. या फोटोवर एक युजर म्हणतो, ‘कारण त्या अप्सरा आहेत’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर आणखी एक म्हणतो ‘हे फोटो खरंच सुंदर आहेत. त्याबरोबरच तिला फोटोशूटसाठी पोज देण्याची योग्य समजही आहे.’ असं म्हणत चाहत्यांनी तिचे सोशल मीडियावर कौतुक केले.

Kushal Badrike's Comment On Sonali Kulkarni Photos
Bollywood Celebrities Blue Tick: एलन मस्क जोमात, बॉलिवूड कोमात; दिग्गज कलाकारांचे ब्लू टिक गायब
Comment
CommentInstagram

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनालीचे या वर्षात अनेक बहुचर्चित आणि बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सोनाली ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’या चित्रपटातून झळकणार आहे. पहिल्यांदाच एका ऐतिहासिक चित्रपटातून ती झळकणार आहे. सोबतच दाक्षिणात्य चित्रपटात ही सोनाली झळकणार असल्याने चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com