Bollywood Celebrities Blue Tick: एलन मस्क जोमात, बॉलिवूड कोमात; दिग्गज कलाकारांचे ब्लू टिक गायब

Bollywood Celebrities Lost Blue Tick: 21 एप्रिलला सकाळी अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली आहे.
Bollywood Celebrity Lost Blue Tick
Bollywood Celebrity Lost Blue TickSaam TV

Celebrity Lost Their Twitter Blue Tick: ट्विटर एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेकजण त्यांची मते व्यक्त करत असतात. कॉमन मॅनसह अगदी दिग्गज व्यक्तिमत्वच ट्विटरवर व्यक्त होताना दिसतात. अनेक सेलिब्रिटी ट्विटरवर सक्रिय आहेत. तसेच त्यानं मत ते ट्विटरवर मांडत असतात आणि अनेजदा त्यावरून चर्चेत येतात.

दरम्यान, गुरुवारी, शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि राजकीय दिग्गजांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले. या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. तर हा ब्लू टिक ट्विटरवर ट्रेंड होत आहे. काही स्टार असे आहेत ज्यांच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढलेली नाही.

Bollywood Celebrity Lost Blue Tick
MC Stan's Cricket With Sachin: रॅपर एमसी स्टॅन अन् सचिन तेंडुलकरने लुटला क्रिकेटचा आनंद; व्हिडिओ व्हायरल

ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी घोषणा केली होती की 20 एप्रिलपासून, सर्व लेगेसी वेरिफाईड अकॉउंटवरून ब्लू टिक काढून टाकले जाईल. त्याचबरोबर त्यांना या सुविधे हव्या आहेत त्यांना पैसे मोजावे लागतील. यामुळे आज म्हणजेच 21 एप्रिलला सकाळी अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

ब्लू टिक काढण्यात आलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, बिपाशा बसू, अर्जुन रामपाल, अनुष्का शर्मा आणि फराह खान यांसारख्या स्टार्सची नावे समाविष्ट आहेत.

अनुपम खेर आणि सोनम कपूर हे बॉलिवूड सेलिब्रिटींचे ब्लू टिक्स काढलेले नाही, तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुरिया, महेश बाबू, ज्युनियर एनटीआर, एसएस राजामौली, नागार्जुन अक्किनेनी, राणा दग्गुबती या स्टारचे ब्लू टिक काढण्यात आलेले नाही.

ट्विटरच्या (Twitter) नवीन नियमांनुसार, एलन मस्क (Elon Musk) यांनी 12 एप्रिल रोजी लीगेसी व्हेरिफाईड ब्ल्यू टिक हटवण्याची घोषणा केली होती. 20 एप्रिलनंतर लीगेसी व्हेरिफाईड ब्ल्यू टिक मार्क व्हेरिफाइड अकाऊंटवरून हटवली जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार कालं रात्रीपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता कुणालाही ब्ल्यू टिक हवी असेल तर त्यासाठी तुम्हला दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे.

ब्ल्यू टिक कशी मिळणार?

ब्ल्यू टिक हवा असेल किंवा आताची ब्ल्यू टिक कायम ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सस्क्रिप्शन 650 रुपये एवढे आहे. तर मोबाईल यूजर्ससाठी दरमहिन्याला 900 रुपये मोजावे लागणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com