Karan Johar On Rani Mukerji
Karan Johar On Rani MukerjiSaam Tv

Koffee with karan 8: 'कुछ कुछ होता है'च्या सेटवर करण जोहरने राणी मुखर्जीसोबत काय केलं होतं?, 25 वर्षांनंतर सत्य आलं समोर

Kuch Kuch Hota Hai Movie: या शोमध्ये ९० च्या दशकातील सुंदर आणि टॉप अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी या दोन्ही बहिणींनी हजेरी लावली. यादरम्यान करण जोहरने 'कुछ कुछ होता है'च्या (kuch kuch hota hai) शूटिंगचे अनेक भन्नाट किस्से सांगितले.
Published on

Karan Johar On Rani Mukerji:

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण 8' (kofee with karan 8) चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आता या शोमध्ये ९० च्या दशकातील सुंदर आणि टॉप अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी या दोन्ही बहिणींनी हजेरी लावली. यादरम्यान करण जोहरने 'कुछ कुछ होता है'च्या (kuch kuch hota hai) शूटिंगचे अनेक भन्नाट किस्से सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'कुछ कुछ होता है'मध्ये राणी मुखर्जीसोबत काजोल आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. या शोमध्ये दोन्ही बहिणींनी या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळीचे अनेक जबरदस्त किस्से शेअर केले. यावेळी करण जोहरने देखील त्या दिवसांचा उल्लेख केला आणि त्याने राणी मुखर्जीच्या आहारावर कसे नियंत्रण ठेवले आणि तिच्या खाण्यावर बंदी कशी घातली हे सांगितले. या चित्रपटाच्या सेटवर करण जोहरने राणी मुखर्जीच्या हातातील जेवणाचे ताट हिसकावले होते. 'कॉफी विथ करण 8' च्या निमित्ताने करणने राणी मुखर्जीसोबत तो असं का वागला होता यामागचे कारण सांगितले आहे.

करण जोहरच्या शोमध्ये राणी मुखर्जी लिंबू रंगाच्या वन पीसमध्ये पोहोचली होती. या ड्रेसवर तिने गोल्डन हिल्स कॅरी केल्या होत्या. ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती. तर काजोलने मरून कलरचा वन-शोल्डर गाऊन घातला होता. कुरळ्या हेअरस्टाईलमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. यावेळी करण जोहरसोबत गप्पा मारताना दोघींनी एकत्र काम केलेल्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील अनेक किस्से दोघींनी शेअर केले.

'कुछ कुछ होता है'च्या शूटिंगचे दिवस आठवताना करण जोहर म्हणतो की, 'मी राणीला सांगितले की मॉरिशसमध्ये आपल्याला शॉर्ट स्कर्ट घालावे लागतात. त्यामुळे तू वजन कमी केले पाहिजे. ती म्हणाली की मी 4 ते 5 किलो वजन कमी करेन. पण तिचे वजन कमी झाले नाही पण वाढले हे नक्की. मी विचार करत होतो की, ती ऑरेंज शर्ट आणि स्कर्ट कसा घालेल?

Karan Johar On Rani Mukerji
Kapil Sharma: 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे!', फ्लाइटला उशिर झाल्यामुळे संतापला कपिल शर्मा, IndiGo एअरलाइन्सची घेतली शाळा

करण पुढे सांगतो की, राणीचे वजन कमी करण्यासाठी त्याने रूम सर्व्हिसला सूचना दिल्या होत्या की राणी मुखर्जीला कोणीही जेवण देऊ नये. करण जोहरने पुढे सांगितले की, राणीला जेवण न देण्याच्या निर्णयात अभिनेत्रीची आई कृष्णा देखील माझ्यासोबत होती. एक दिवस राणी मुखर्जी नाश्ता करत असताना करणने तिच्या हातातून नाश्त्याची प्लेट हिसकावून घेतली. करणने अभिनेत्रीला सांगितले, तू हे खाऊ शकत नाहीस.

Karan Johar On Rani Mukerji
Randeep Hooda Lin Laishram Wedding: रणदीप हुड्डा अडकला लग्नबंधनात, पारंपारिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com