Tumbbad Unknown Facts : 'तुंबाड' मधील 'ती' भयानक आजी कोण? अभिनेत्री नव्हे तर चित्रपटातील 'या' अभिनेत्याने साकारली भूमिका

Tumbbad Grandmother Role : 'तुंबाड' हा भय चित्रपट चांगलाच गाजत आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. यातील आजीची भूमिका कोणी साकारली जाणून घेऊयात.
Tumbbad Grandmother Role
Tumbbad Unknown FactsSAAM TV
Published On

'तुंबाड' (Tumbbad) चित्रपटाच्या रि-रिलीजने देखील भरपूर कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट तब्बल 6 वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला आधीपेक्षा जास्त प्रेम मिळाले. हा भय चित्रपट पाहताना अंगावर शहारा येतो. या चित्रपटात वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगलेल्या एका शापित आजीचे चित्रण करण्यात आले आहे. ही भूमिकेमागचा खरा चेहरा आज जाणून घेऊयात.

तुंबाड या चित्रपटाची कथा हस्तर नावाच्या राक्षसाभोवती फिरते. त्याला त्याचे शापित पैसे मिळवायचे असतात. या चित्रपटात सोहम शाहने मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर मोहम्मद समदने त्याचा मुलाची भूमिका साकारली आहे. तुंबाड चित्रपटातील आजीची भयानक भूमिका होती. झोप जा, नाहीतर हस्तर येईल' असे म्हणतं ती घरच्यांना वारंवार घाबरवत असते.

चित्रपटाच्या सुरुवातीला नखांनी झाकलेला तिचा चेहरा दाखवला जातो तेव्हा ती भुतापेक्षा कमी दिसत नाही. मीडिया रिपोर्टनुसार, ही भूमिका 12 वर्षाच्या मुलाने केली आहे. 12 वर्षाच्या मुलांने 500 किलोचा आजीचा लूक केला होता. मात्र तो लूक पुढे रिजेक्ट करण्यात आला. या चित्रपटात सोहम शाहच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या मोहम्मद समदने (Mohammad Samad) आजीची भूमिकाही साकारली होती. चित्रपटात दिसणारा लूक प्रोस्थेटिक मेक-अपच्या मदतीने करण्यात आला होता. या चित्रपटात मोहम्मद समदने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.

'तुंबाड' चित्रपटाच्या रि-रिलीजच्या दिवशीच 'तुंबाड २'ची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांना आनंद झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tumbbad Grandmother Role
Aishwarya Rai And Aaradhya Bachchan : आराध्या आईसोबत जगभर फिरते, मग शाळेत केव्हा जाते ? ट्रोलर्सच्या प्रश्नावर ऐश्वर्या रायचं खणखणीत उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com