Riteish-Genelia: महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात? वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Riteish Deshmukh - Genelia Dsouza Nickname : महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा एकमेकांना कोणत्या टोपण नावाने हाक मारतात हे जाणून घ्या. हे दोघेही महाराष्ट्राचे पावर कपल आहेत.
Riteish Deshmukh - Genelia Dsouza Nickname
Riteish-Genelia NicknameSAAM TV
Published On

रितेश-जिनिलिया ही महाराष्ट्राची खूप आवडती जोडी आहे. या जोडीला चाहत्यांकडून नेहमीच प्रेम आणि माया मिळत असेत. यांच्या बाबत कोणतेही अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. यांना दोन क्युट मुलं आहेत ज्यांच्यावर रितेश-जिनिलियाने खूप चांगले संस्कार केले आहेत. रितेश-जिनिलिया एकमेकांवर प्रेम व्यक्त करायला कसलाच विचार करत नाही. नेहमी एकमेकांचा आदर ठेवतात.

महाराष्ट्राचं पावर कपल रितेश (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia Dsouza) नेहमीच आदर्श नात्याचे उदाहरण राहणार आहेत. यांना महाराष्ट्रात लाडके दादा वहिनी ओळखले जाते. दोघे नेहमी जेव्हा एकत्र स्पॉट होतात. तेव्हा एकमेकांना आदर देताना पाहायला मिळतात. दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आणि आदर करतात.

जिनिलिया आपल्याला अनेक वेळा कार्यक्रमाला , मीडियासोबत बोलताना "अहो!ऐकलतं का" अशी हाक मारताना दिसते. ती दोघ नेहमीच एकमेकांना आदरपूर्वक हाक मारतात. मीडिया रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत या दोघांना एकमेकांच्या टोपण नावांविषयी विचारल्यावर मजेशीर नावे ऐकायला मिळाली. रितेश जिनिलिया पहिल्यापासून जीन्स म्हणायचो. जेनिलियाचं शॉर्ट फॉर्म जीन्स आणि जीनझी असं मी म्हणतो. असा खुलासा रितेशने केला तर जिनिलिया रितेशला प्रेमाने डॉलू म्हणते. या गोड नावांप्रमाणेच रितेश आणि जिनिलिया सुद्धा एकमेकांवर अपार प्रेम करतात.

बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांची ओळख आहे. यांचे एकत्र चित्रपट हिट झाले आहेत. रितेश आणि जिनिलिया पहिली भेट चित्रपटाच्या सेटवर झाली. 'तुझे मेरी कसम' असे त्या चित्रपटाचे नाव होते. सुरुवातीला जिनिलिया रितेशकडे लक्ष देत नव्हती कारण तिला असे वाटत होते की, श्रीमंत घरातील बिघडलेला मुलगा असेल. पण कालांतराने त्या दोघांमध्ये छान मैत्री झाली. 'मस्ती'चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. रितेश-जिनिलियाने 9 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नला आता अनेक वर्ष झाली आहेत. तर ही जोडी नेहमी एकमेकांच्या प्रेमात पाहायला मिळते. या दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीत लग्न केले.

Riteish Deshmukh - Genelia Dsouza Nickname
Ranbir Kapoor : 'रॉकस्टार' रणबीरला का थोबाडीत खावी लागली? तेही तब्बल तीन वेळा, नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com