Bigg Boss Marathi : रितेश देशमुखच्या सरप्राइजमुळे स्पर्धकांना अश्रू अनावर, नेमकं भाऊच्या धक्क्यावर आज काय घडणार?

Riteish Deshmukh : बिग बॉसच्या सदस्यांना मिळालं भन्नाट सरप्राइज जे पाहून स्पर्धक भावुक झाले आहेत. नेमंक रितेश देशमुख यांनी काय सरप्राइज दिलं जाणून घ्या.
Riteish Deshmukh
Bigg Boss Marathi SAAM TV
Published On

बिग बॉस मराठीचं (Bigg Boss Marathi) हे पर्व चांगलच गाजत आहे. रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. हा आठवडा खूप नकारात्मक भावनांचा होता. त्यामुळे घराला थोड सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी रितेश भाऊ नवीन सरप्राइज घेऊन आले आहेत.

स्पर्धक असो वा प्रेक्षक सर्वजण भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहत असतात. बरेच प्रेक्षकांना रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांची सूत्रसंचालनाची स्टाईल खूप आवडते. भाऊच्या धक्का शिक्षेसोबतच आनंदही घेऊन येतो. नुकताच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश भाऊ बिग बॉस घरात एन्ट्री मारताना दिसत आहेत. तसेच भाऊ आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राइज देणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रितेश भाऊला पाहून सदस्यांना खूप आनंद झाला आहे. सर्वजण त्यांची गळाभेट घेत आहेत. "तुमच्यासाठी मी घरच इकडे आणतोय", असे म्हणताना रितेश देशमुख दिसत आहे.

आजच्या एपिसोडमध्ये घरातील सदस्य आपल्या कुटुंबाना भेटणार आहेत. रितेश देशमुख पॅडी, जान्हवी, अभिजीत, अंकिता, अरबाज एकंदर सर्वच सदस्यांना आधार देताना पाहायला मिळत आहे. बिग बॉसच हे सरप्राइज पाहून सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत. स्पर्धकांना आपल्या कुटुंबाला भेटून विशेषतः मुलांना भेटून खूप आनंद झाला आहे. स्पर्धक आणि कुटुंबियांमध्ये नक्की कोणता संवाद घडतो हे पाहणे मनोरंजक आणि खूप भावनिक ठरणार आहे. तसेच रितेश भाऊ सदस्यांना काय सल्ला देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबाला भेटल्यावर सदस्या कोणत्या उत्साहाने गेम खेळणार हे पाहणे रंजक ठरेल.

Riteish Deshmukh
Like And Subscribe Movie:पाऊस, मातीचा सुगंध अन् गणरायाचं स्वागत; शुभंकरने सांगितला कोकणातल्या गणेशोत्सवाचा खास अनुभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com