

Moving In With Malaika: मलायका अरोरा नेहमीच तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत असते. मलायकाचा फिटनेस सध्याच्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवेल इतका हटके आहे. सध्या मलायका तिचा नवीन शो 'मूव्हिंग इन विथ मलायका' (Moving In With Malaika) मुळे चर्चेत आहे. मलायका या शोमध्ये आपल्या खुमासदार शैलीने पाहुण्यांना प्रश्न विचारत असते. तिच्या या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड मधील दिग्गज कलाकार मंडळींनी ही मुख्य हजेरी लावली आहे.
करणचे हे बोलणे ऐकून मलायकाचा चेहरा लज्जास्पद होतो. करण जोहरने मलायकाला तिच्या काही खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले, पण मलायकाने याचे उत्तर देणे टाळले आहे. मलायकाच्या शोमध्ये करण जोहर पाहुणा म्हणून आला आहे. या प्रोमो मध्ये, करण मलायकाला असे काही प्रश्न विचारतो की ते ऐकूणच ती लाजते. मलायकाने देखील विचार केला होता की करणने कोणताही प्रश्न विचारला आणि विनोद केला तरी ती उत्तर देणार नाही. करण जोहरचा तो विचित्र प्रश्न ऐकून फक्त लाजली.
यावेळी तिच्या शोमध्ये बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहर या शोमध्ये पोहोचला आहे. त्यावेळी दोघांचीही अप्रतिम केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता आली. याची घोषणा मलायकाने इंस्टाग्राम पेजवरुन केली आहे. या व्हिडीओत मलायका आणि करण संभाषण करताना दिसत आहे. या शोचे काही अनफिल्टर्ड संवाद व्हायरल होत आहेत ज्यात करण जोहर मलायकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत असे प्रश्न विचारतो, ज्यामुळे मलायका लगेच लाजते.
मलायकाने कोणतेही उत्तर न दिल्याने करण जोहरने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायला सुरुवात केली. करण जोहरने सांगितले की, त्याने एकदा भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये तो पोलिस बनला, पण कपडेच व्यवस्थित बसले नाही. त्याला सिंघम व्हायचे होते, तो प्लॅनही सपशेल अपयशी ठरला होता. करणचे हे शब्द ऐकून मलायकाला हसू आवरले नाहीत. करण जोहरने मलायकाला तिच्या लग्नाच्या योजनांबद्दल विचारले आणि तिला लग्नासाठी राजी करण्याचाही प्रयत्न केला. करणच्या या प्रश्नाला मलायकाने विरोध केला.
मलायकाचा हा नवा शो चाहत्यांना आवडला आहे. मलायकाचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. लोकांना तिच्या फिटनेसपासून ते सौंदर्य आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. या शोच्या माध्यमातून मलायकाची वैयक्तिक बाजू जाणून घेण्याची संधी लोकांना मिळत आहे. याशिवाय सोबतच तिची या कार्यक्रमातील मस्ती आणि जोक्सही चाहत्यांना आवडतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.