I Prem U: दाक्षिणात्य अभिनेत्रीची 'I प्रेम U' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचा रोमँटिक टीझर प्रदर्शित

त्यामुळे प्रेम म्हणजे काय? याची गोष्ट "I प्रेम U" या रोमँटिक चित्रपटात मांडली जाणार आहे.
I Prem U
I Prem USaam Tv
Published On: 

Kaydu Lohar: प्रेम म्हणजे न सुटणारं समीकरण असं गणिततज्ज्ञ सांगतात, तर प्रेमात पडण्याचा गुरुत्वाकर्षणाशी संबंध नाही असं आइन्स्टाइन सांगतात. त्यामुळे प्रेम म्हणजे काय? याची गोष्ट "I प्रेम U" या रोमँटिक चित्रपटात मांडली जाणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री कायदू लोहार या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. कायदू आणि अभिजित अमकर ही फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. येत्या १७ मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

I Prem U
Sangeet Devbabhali: अनेक पुरस्कार प्राप्त 'संगीत देवबाभळी' नाटकाचा महाराष्ट्र दौरा, असा असेल दौरा...

"I प्रेम U" या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती साईश्री एंटरटेन्मेंटच्या मधुकर गुर्सल, नितीन कहार यांनी केली आहे. नितीन कहार यांनीच लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, संजू-संग्राम आणि यशोधन कदम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

I Prem U
Ghar Banduk Biryani: 'प्रेमाची भावना तर सारं जग...', व्हॉलेंटाईन्स डे निमित्त'घर बंदूक बिरयानी' मधलं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

आसाममधील तेजपूर येथे जन्म झालेल्या कायदू लोहारनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मुगीलपेटे, पोथानपाथम नूट्टांडू, अलुरी असे कन्नड, मल्याळममधील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता ती मराठीत पाऊल टाकत आहे. तिच्याबरोबर एक सांगायचंय, टकाटक अशा चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झालेला अभिनेता अभिजित अमकर या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com