Hit And Run : प्रसिद्ध अभिनेत्रीनं दुचाकीला ठोकलं अन् घटनास्थळावरून पळाली; अपघाताचा व्हिडिओ समोर

Divya Suresh hit and run accident Bangalore : बंगळुरूमधील हिट अँड रन प्रकरणात कन्नड अभिनेत्री दिव्या सुरेशचा समावेश असल्याचे समोर आले. तिने दुचाकीला ठोकलं आणि घटनास्थळावरून पळ काढल्याचं CCTV मध्ये दिसलं.
Divya Suresh Hit And Run case
Divya Suresh Hit And Run caseSaam TV Marathi News
Published On

Divya Suresh Hit And Run case : बंगळुरूमधील हिट अँड रन प्रकरणात प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री दिव्या सुरेश हिचं नाव समोर आले आहे. दिव्या सुरेश हिने दुचाकीला ठोकलं अन् घटनास्थळावरून पळ काढल्याचं समोर आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले होते. जबयतरायणपुरा येथे ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात पोलिसांनी कन्नड अभिनेत्री दिव्या सुरेश हिची ओळख पटवली आहे. (Kannada actress flees scene after hitting motorcycle)

दिव्या सुरेश ही भरधाव वेगात गाडी चालवत होती. तिने मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या तीन जणांना जोरात धडक दिली अन् घटनास्थळावरून पळ काढल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासही सुरू केला आहे. दिव्या सुरेश हिला अटक करण्यात येऊ शकतं, असं सूत्रांनी सांगितले आहे.

Divya Suresh Hit And Run case
भरधाव कारने ८ जणांना चिरडलं, ५ जणांचा जागेवरच मृत्यू, महामार्गावर मृत्यूचं तांडव

ब्यतारायणपुरा येथे झालेल्या हिट अँड रन घटनेत पोलिसांनी कन्नड अभिनेत्री दिव्या सुरेश हिला कथित चालक म्हणून ओळखलेय. या अपघातात तीन जण जखमी झाले होती. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे किरण आणि त्यांच्या चुलत बहिणी अनुषा आणि अनिता मोटारसायकलवरून जात होत्या, त्यावेळी एका भरधाव गाडीने जोरात धडक दिली अन् पळ काढला होता. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात आला. कार चालक दिव्या सुरेश असल्याचे पोलिसांनी सांगितलेय.

Divya Suresh Hit And Run case
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

पोलिस तक्रारीनुसार, किरण (२५) आणि अनुषा (२४) यांना किरकोळ दुखापत झाली, तर अनिता (३३) हिचा पाय मोडला. अनिताला शस्त्रक्रियेसाठी बीजीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७ ऑक्टोबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास वेगात कऱण्यात आला होता. आता ती गाडी दिव्या सुरेशची होती आणि त्यावेळी ती गाडी चालवत होती, असे समोर आले आहे.

Divya Suresh Hit And Run case
Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com