Actor Kamaal R Khan (KRK) Arrested By Mumbai Police
Mumbai Firing case saam tv

Mumbai Firing case : KRK ला पोलिसांनी घेतलं ताब्यात; अभिनेत्याने दिली गुन्ह्याची कबुली, नेमकं प्रकरण काय?

Actor Kamaal R Khan (KRK) Arrested By Mumbai Police : प्रसिद्ध अभिनेता कमाल राशिद खानला पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार प्रकरणी त्याला ताब्यात घेतले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Published on
Summary

मुंबईत ओशिवरा अंधेरी येथे गोळीबार झाला.

गोळीबारा प्रकरणी अभिनेता केआरकेला अटक करण्यात आली आहे.

अभिनेत्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडिया सेलिब्रिटीला गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 18 जानेवारीला मुंबईत ओशिवरा अंधेरी येथील एका बिल्डींगमध्ये गोळीबार केल्याच्या आरोपाखाली सोशल मीडिया सेलिब्रिटी कमाल राशिद खान (Kamaal R. Khan- केआरके) ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्टनुसार, लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा हे गोळाबार झालेल्या बिल्डींगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आणि मॉडेल प्रतीक बैद चौथ्या मजल्यावर राहतात. सुरुवातीला गोळ्या कोणी झाडल्या हे स्पष्ट नव्हते. मात्र आता तपासा दरम्यान असे समजले की, केआरकेने गोळीबार केला आहे.अभिनेत्याला त्याच्या स्टुडिओमधून ताब्यात घेण्यात आले आहे.ओशिवरा गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता आणि दिग्दर्शक कमल आर खानला ताब्यात घेतले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना नालंदा सोसायटीत घडली. गोळीबारानंतर दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गोळ्यांचे निशाण आढळून आले.

मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यावर समजले की, केआरकेने स्वतःच्या लाइसेंस बंदुकीने गोळ्या झाडल्या (4 Rounds) आहेत. तशी त्याने कबुली देखील दिली आहे. केआरकेच्या म्हणण्यानुसार, केआरकेचा कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता. तो त्याची बंदूक साफ करत होता. त्याच्या घरासमोर एक मोठे खारफुटीचे जंगल आहे. जिथे बंदूक साफ केल्यानंतर त्याची टेस्ट करण्यासाठी त्याने गोळीबार केला. अभिनेत्याला वाटले होते की, गोळी खारफुटीच्या जंगलात जाईल, पण जेव्हा त्याने गोळीबार केला तेव्हा सोसाट्याचा वारा आला त्यामुळे गोळी थोडी पुढे जाऊन ओशिवरा परिसरातील एका इमारतीला लागली. पोलिसांनी केआरकेची बंदुक जप्त केली आहे, जी त्याने गोळीबार करण्यासाठी वापरली होती. या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे.

Actor Kamaal R Khan (KRK) Arrested By Mumbai Police
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात राशनच्या गोण्यांचा तुटवडा; रोशन अन् ओंकारमध्ये तुफान राडा, पाहा VIDEO

कमाल आर खान कोण?

केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो एक प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आहे. तो अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटांवर टीका करताना दिसतो. तसेच बॉलिवूड स्टार्सना शिवीगाळ करताना दिसतो. कमल आर खान 'देशद्रोही' चित्रपटात दिसला. त्याने चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणूनही काम केले आहे. केआरके 'बिग बॉस 3' मध्ये दिसला, ज्यामुळे त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली. त्याने 'एक व्हिलन' चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारली.

Actor Kamaal R Khan (KRK) Arrested By Mumbai Police
Famous Actor Wedding : टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता चढला बोहल्यावर; बायको आहे तरी कोण? पाहा खास क्षणांचे PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com