Janhvi Kapoor : 'याला तुरूंगात टाका', मराठी तरूणीला रूग्णालयात मारणाऱ्या गोकुळच्या कृत्यावर जान्हवी संतापली

Janhvi Kapoor Post On Kalayan Clinic Assault: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने कल्याणमधील एका खाजगी क्लिनिकमध्ये घडलेल्या रिसेप्शनिस्टच्या मारहाण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
Janhvi Kapoor Post On Kalayan Clinic Assault
Janhvi Kapoor Post On Kalayan Clinic AssaultSaam tv
Published On

Janhvi Kapoor Post On Kalayan Clinic Assault: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने कल्याणमधील एका खासगी क्लिनिकमध्ये घडलेल्या रिसेप्शनिस्टच्या मारहाण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. या घटनेत एका व्यक्तीने रिसेप्शनिस्ट महिलेला केवळ डॉक्टर वेळेवर उपलब्ध नव्हते म्हणून जबर मारहाण केली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यावर अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत.

जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही घटना शेअर करत तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ती म्हणाली, "या व्यक्तीला तुरुंगात टाका. एका महिलेला अशा प्रकारे मारणे हे केवळ गुन्हा नाही तर अत्यंत घृणास्पद कृत्य आहे."जान्हवीने पुढे लिहिले की, लाज वाटायली पाहिजे ती रिसेप्शनिस्ट आपल्या कर्तव्यासाठी तिथे होती, ती डॉक्टर नाही. अशा वागणुकीला समाजात कोणतीही जागा नसावी."

Janhvi Kapoor Post On Kalayan Clinic Assault
Saiyaara: लव्हस्टोरी की ओव्हर हाईप, काय आहे 'सैयारा'च्या यशाचं सिक्रेट

या घटनेबाबत सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरसारखे अनेक सेलिब्रिटी व्यक्ती या घटनेबाबत आवाज उठवत असल्याने प्रकरणाला आता अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.

Janhvi Kapoor Post On Kalayan Clinic Assault
Health Care: हेल्दी डाईटसाठी दररोज किती मनुके खावेत?

जान्हवी कपूरच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, नीरज घायवान दिग्दर्शित आणि ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्यासह तिचा पुढील चित्रपट 'होमबाउंड' कान्समध्ये यशस्वी प्रदर्शनानंतर २०२५ मध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. याचसह लवकरच ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि धर्मा प्रॉडक्शनची 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटात झळकणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com