Shruti Vilas Kadam
सामान्य हेल्दी डाईटसाठी दिवसाला सुमारे १५ ते ३० मनुके खाणे पुरेसे मानले जाते.
रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास ते पचनास अधिक सोपे होते आणि अँटीऑक्सिडंट्स वाढतात.
मनुकांमध्ये भरपूर लोह असते, जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते.
फायबरयुक्त असल्यामुळे मनुके पचनक्रियेस चालना देतात आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवतात.
नैसर्गिक साखर असल्यामुळे मनुके थकवा दूर करतात आणि शरीराला ऊर्जा देतात.
मनुके कोलेस्टेरॉल कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.
जास्त प्रमाणात मनुके खाल्ल्यास साखर आणि फायबर अधिक होते, ज्यामुळे अपचन किंवा पोटदुखी होऊ शकते.