Shruti Vilas Kadam
मूग डाळ – १ कप, साखर – १ कप, दूध – १/२ कप, तूप – १/२ कप, पाणी – १ कप, वेलदोडा पूड – १/२ चमचा, सुका मेवा – बदाम, काजू, किशमिश
मुगाची डाळ ३–४ तास पाण्यात भिजवा. नंतर पाणी काढून डाळ बारीक वाटून घ्या (थोडी जाडसर ठेवावी).
एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून त्यात वाटलेली डाळ टाका आणि सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर परतत रहा.
एका बाजूला दुसऱ्या भांड्यात साखर, पाणी आणि दूध घालून थोडा उकळून सरळ पाक तयार करा.
डाळ शिजल्यावर त्यात हा साखरेचा पाक हळूहळू घालून सतत ढवळा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
शेवटी त्यात वेलदोड्याची पूड आणि तुपात परतलेला सुका मेवा घालून नीट मिक्स करा.
शिरा थोडा घट्ट झाला की गॅस बंद करा आणि गरम गरम मूग डाळ हलवा सर्व्ह करा.