Ibrahim Ali Khan : "ती खूप...", इब्राहिम अली खानने पलक तिवारीसोबत डेटिंगच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं

Ibrahim Ali Khan-Palak Tiwari Dating : इब्राहिम अली खानने पहिल्यांदाच पलक तिवारीसोबत सुरू असलेल्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडले आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Ibrahim Ali Khan-Palak Tiwari Dating
Ibrahim Ali KhanSAAM TV
Published On

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. इब्राहिम अली खान पलक तिवारीला (Palak Tiwari ) डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. याबाबत आता इब्राहिम अली खानने मौन सोडले आहे. त्याने पलक तिवारीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. इब्राहिम अली खान पलक तिवारीबद्दल नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. ते कायम एकमेकांसोबत छान वेळ घालवताना दिसतात. अलिकडेच त्यांनी मालदीवची ट्रिपही केली. अलिकडेच एका मिडिया मुलाखतीत इब्राहिम अली खान म्हणाला की, "पलक खूप गोड मुलगी आहे. एकदम क्यूट आहे. ती माझी चांगली मैत्रीण आहे. " इब्राहिम अली खानच्या या वक्तव्यामुळे पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानच्या डेटिंगच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

इब्राहिम अली खानने 'नादानियां' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. चित्रपटातील त्याचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला आहे. तसेच चित्रपटातील त्याच्या हँडसम लूकवर चाहते फिदा झाले आहेत. आता इब्राहिम लवकरच 'सरजमीन' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सरजमीन' चित्रपटात इब्राहिम अली खान बॉलिवूडची सुपरस्टार काजोलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच या चित्रपटात साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमार देखील आहे.

पलक तिवारी ही टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. पलक देखील उत्तम अभिनेत्री आहे. लवकरच ती 'भूतनी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पलक तिवारी संजय दत्त आणि मौनी रॉयसोबत पाहायला मिळणार आहे. चाहते या दोघांच्याही चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Ibrahim Ali Khan-Palak Tiwari Dating
Kedar Shinde : 'झापुक झुपूक' चित्रपटाची कथा नेमकी काय? केदार शिंदेंनी केला मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com