महाराष्ट्राची क्रश म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या हृताचा आज वाढदिवस... हृताचा जन्म आज अर्थात १२ सप्टेंबर १९९३ रोजी झाला आहे. ‘फुलपाखरू’ मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री हृता संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाली. अभिनेत्रीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवताच अवघ्या काही दिवसात तिने प्रसिद्धी मिळवली. सिनेसृष्टीतला कोणताही पाठिंबा नसताना अभिनेत्रीने स्वत:च्या हिंमतीवर आपले स्थान पक्के केले. तरुणांच्या गळ्यातली ताईत म्हणून अभिनेत्री प्रचंड प्रसिद्ध झाली. मालिकेंसह चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे पात्र साकारत स्वत:ची एक प्रतिमा तयार केली.
हृताने २०२२ मध्ये हिंदी टेलिव्हिजन सृष्टीतला सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लव्हस्टोरीची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होत असते. लग्नानंतर अनेकदा अभिनेत्री परदेशातच दिसून आली आहे. लग्नानंतर हृताने ‘अनन्या’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यानंतर तिचा बहुचर्चित ‘टाईमपास ३’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपटातील वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकेंमुळे अभिनेत्री खूपच चर्चेत आली होती. नुकतंच अभिनेत्रीसाठी तिच्या पतीने अर्थात दिग्दर्शक प्रतिक शाहने आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट केली आहे.
दिग्दर्शक प्रतिक शाह आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. ३० वं वर्ष मोठं साजरं करु. आणखी आनंदी, शहाणं, श्रीमंत आणि निरोगी होण्यासाठी शुभेच्छा. जगभरामध्ये मज्जा आणि प्रेम करुया... अजून बरीच वर्षे बाकी आहेत.” आपल्या पतीच्या पोस्टवर अभिनेत्रीने ‘थँक्यू बेबी, लव्ह यू’ असं म्हणत तिने प्रतिक्रिया दिली. (Actress)
त्या हृताला तिच्यासोबत ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत झळकलेला अजिंक्य राऊतने ही तिला खास पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अजिंक्य राऊत पोस्टमध्ये म्हणतो, “कारण आहे, हृताचा वाढदिवस. आणि आज मला हृता तुझी खूप आठवण येते. एका सुंदर मुलीसोबत काम करताना मला मिळालेल्या अनेक सुंदर आठवणींपैकी एक आठवण मी इथे शेअर करतोय. मंदार देवस्थळीसर एक दिग्दर्शक म्हणून आणि एक कलाकार म्हणून तुम्ही आमच्याकडून खूप चांगलं काम करुन घेतलं. आम्हाला तुमच्यासोबत आणि तुमच्या संपूर्ण टीमसोबत काम करताना खूप मज्जा आली.” (Entertainment News)
अजिंक्य राऊत आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “सोबतच मला हृतासारख्या सुंदर अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद, त्यात तुमच्या आणि मंदार सरांशिवाय माझा प्रवास कधीच सारखा होऊ शकला नसता. त्यात तुमच्या आणि मंदार सरांशिवाय माझा प्रवास कधीच पूर्ण होऊ शकला नसता. हृता तुझ्यावर खूप प्रेम आहे. नेहमीप्रमाणे हा सुद्धा तुझा वाढदिवस सुंदर जावो, तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा, बाकी तू एक सर्वोत्तम अभिनेत्री आहे, हे तुला तर ठाऊक आहे...”
हृताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री हृता दुर्गुळे गेल्या काही दिवसांपूर्वी ‘सर्किट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गेल्या वर्षी हृता दुर्गुळेने ‘अनन्या’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ती प्रेक्षकांच्या भेटीला ‘टाईमपास ३’च्या माध्यमातूनही आली होती. सोबतच हृताने सर्वात आधी ‘दुर्वा’ या मालिकेच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं होतं. ‘फुलपाखरू’ या मालिकेने तिला चांगलीच प्रसिद्धी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.