Jawan Break Record: 'जवान'चा जलवा कायम... 4 दिवसात 250 कोटींची कमाई; हे फक्त शाहरुख खानच करू शकतो

JawanCollection: 'जवान' बॉक्स ऑफिसवर २५० कोटींची कमाई केली आहे.
Jawan Collection
Jawan CollectionInstagram @redchilliesent
Published On

Jawan Collect 250 Crore In 4 Days:

शाहरुख खान यावर्षी चित्रपटांमध्ये कमबॅक केले आहे. ४-५ वर्षाच्या ब्रेकनंतर शाहरुख खानचे सलग ३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शाहरुखच्या 'पठान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कमाल केली. आता त्याचा 'जवान' चित्रपट रेकॉर्ड करत आहेत.

अवघ्या चार दिवसात शाहरुख खानच्या यावर्षीच्या दुसऱ्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींची कमाई केली आहे. तर जवानने अनेक दमदार कमाई करणाऱ्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Jawan Collection
Pushpa 2 Release Date: 'पुष्पा येतोय...' अखेर अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तरण आदर्श यांनी जवानसह बॉलिवूडमधील इतर चित्रपटांनी २५० कोटींचा आकडा किती दिवसात पार केला हे सांगितले आहे.

शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने चार दिवसात २५२ कोटींची कमाई केली. तर पठानला हा आकडा काढण्यासाठी ५ दिवस लागले होते. तर सनी देओलच्या 'गदर २'ने हा २५० कोटींचा आकडा ६ दिवसात काढला होता. KGF चॅप्टर २च्या हिंदी व्हर्जन ७ दिवसात २५० कोटींचे कलेक्शन केले होते. बाहुबली २ हिंदीला २५० कोटीची कमाई करायला ८ दिवस लागले होते.

तर आमिर खानचा दंगल, रणबीर कपूरचा संजू आणि सलमान खानचा टायगर जिंदा है या चित्रपट २५० आकडा गाठण्यासाठी १० दिवस लागले होते.

जवान चित्रपटाविषयी थोडक्यात

'जवान' चित्रपटातून दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली आणि अभिनेत्री नयनतारा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये विजय सेतूपती नकारात्मक भूमिका साकारत आहेत. या चित्रपटातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडला असून बॉक्स ऑफिसवर त्याचे प्रतिबिंब दिसत आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com