Toby Keith Died: हॉलिवूडचे प्रसिद्ध गायक टोबी कीथ यांचे निधन

Hollywood Singer Toby Keith Died: टोबी कीथ हे पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारादरम्यान 5 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
Toby Keith Died
Toby Keith DiedSaam Tv
Published On

Toby Keith Hit Songs:

हॉलिवूडमधून (Hollywood) एक अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून लाखो हृदयांवर राज्य करणारा गायक टोबी कीथ यांचे निधन झाले आहे. अमेरिकन कंट्री म्युझिक लिजेंड टोबी कीथ यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, टोबी कीथ हे पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारादरम्यान 5 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. टोबी कीथ यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रार्थना करत आहेत.

वयाच्या 62 व्या वर्षी टोबी किथ यांच्या निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. टोबी कीथला कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते. कर्करोगाविरोधातील त्यांचा लढा सोमवारी संपला. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टोबी कीथ हे अमेरिकन पॉप स्टार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. कीथ यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Toby Keith Died
Kiara Advani आणि Sidharth Malhotra ची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी, रोममध्ये केला होता लग्नासाठी प्रपोज

सोशल मीडियावर गायक टोबी कीथ यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'अत्यंत दुःखाने कळवावे लागत आहे की, आमचे लाडके टोबी कीथ यांनी ५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कुटुंबीयांच्या समोर अखेरचा श्वास घेतला. मोठ्या शौर्याने ते कर्करोगाविरोधातील लढाई लढले.'

Toby Keith Died
Bharat Takhtani ला घटस्फोट दिल्यानंतर Isha Deol याठिकाणी राहणार, २ मुलींची जबाबदारी नेमकं कोण घेणार?

टोबी कीथ यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्यांचे पहिले गाणे 'शुड हॅव बीन अ काउबॉय' हे 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला देशातील चार्टमध्ये अव्वल स्थानावर होते. टोबी कीथ यांच्या हिट गाण्यांमध्ये 'हाऊ डू यू लाइक मी नाऊ? (1999)', 'बीअर फॉर माय हॉर्सेस' (2003) आणि 'ॲज गुड ॲज आय वन्स वॉज' (2005) यांचा समावेश आहे. कीथ यांनी दोन ख्रिसमस अल्बम, 5 संकलन अल्बम आणि 19 स्टुडिओ अल्बम रिलीज केले. जगभरात त्यांच्या अल्बमच्या 40 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या.

Toby Keith Died
Arvind Jagtap: 'घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही...', लेखक अरविंद जगताप यांची पोस्ट चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com