Shivali Parab Holi Celebration: "सैराट झालं जी...", होळीच्या रंगात रंगली कल्याणची चुलबुली, व्हिडीओ पाहून चाहते झाले घायाळ

Shivali Parab Holi celebration Dance Video: नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
Shivali Parab  Holi Celebration
Shivali Parab Holi celebration Dance Videointsragram
Published On

महाराष्ट्राला खळखळवून हसवणारी कल्याणची चुलबुली म्हणजेच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शिवाली परब हिची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. शिवाली परबने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर होळी खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. शिवालीच्या चाहत्यांनी यामध्ये तिला भरभरून प्रेम दाखवत कमेंट्स केल्या आहेत.

सोशल मीडियावर सगळ्याच अभिनेत्री रंगपंचमी साजरी करतानाचे फोटोज शेअर करत आहेत. त्यामधील महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कल्याणची चुलबुलीने सुद्धा सहभाग घेतला. हिने @parabshivali या अकाउंटवर होळीचे रंग आकाशात उडवतानाचा सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्यासोबत एक मुलगा तिच्यावर रंग उडवताना आणि होळी खेळचाना दिसला. यामध्ये शिवालीने सुप्रसिद्ध गाण्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Shivali Parab  Holi Celebration
Chhaava Movie Review : सासूबाईंनी केलं जावयाचं कौतुक! 'छावा' मधील सुव्रत जोशीच्या नकारात्मक भूमिकेबद्दल शुभांगी गोखले म्हणाल्या...

शिवालीने यामध्ये पांढऱ्या रंगाचा कुर्ता, गालावर गुलाबी रंग, डोक्यावर चष्मा आणि गळ्यात लाल पिवळा दुपट्टा असा एक ट्रेंडी लुक केला आहे. अशा प्रकारे कल्याणच्या चुलबुलीची होळी साजरी झाली आहे. तिचे चाहते तिच्या या पोस्टला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. तर शिवाली परब नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंगसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.

काही महिन्यांपुर्वीच शिवाली परबचा 'मंगला' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात एखाद्याच्या रुपाबरोबर त्याच्या कलेला पुढे जाऊ देत नाहीत. आणि त्यामध्ये काही वाईट वृत्तीचे राक्षसी लोकं काहींना पुढे जाऊ न देता त्यांच्या कलेलाही त्रास देतात. मात्र शेवटी नेहमीच सत्याचा विजय असतो. असा महत्वाचा बोध देणारा चित्रपट प्रचंड चर्चेचा ठरला.

मंगला हा चित्रपट एका खऱ्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी सिनेमा गृहात प्रदर्शित झाला. याचे दिग्दर्शन अर्पणा हॉशिंग यांनी उत्तमरित्या पार पाडले. तर याची निर्मिती अर्पणा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर, यशना मुरली, मोहन पुजारी यांनी केली आहे. तर संगीत शंतनु आणि त्यांच्या टिमने केले होते. तर गाणी निहार शेंबेकर, रोंकिनी गुप्ता, स्नेहल मालगुंडकर या गायकांनी केले.

Shivali Parab  Holi Celebration
Chanakya Niti: वाईट वागाल तरच पुढे जाल! चाणक्यांचे 'हे' कोट्स कधीच विसरू नका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com