Himesh Reshammiya Father Died : गायक हिमेश रेशमियाला पितृशोक, 87 वर्षी वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

Himesh Reshammiya : अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन झाले आहे. संपूर्ण बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
Himesh Reshammiya
Himesh Reshammiya Father DiedSAAM TV
Published On

बॉलिवूडचा सिंगर हिमेश रेशमियावर (Himesh Reshammiya) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाचे वडील संगीत दिग्दर्शक होते. हिमेश रेशमियाचे वडील विपिन रेशमिया (Vipin Reshammiya) हे संगीत दिग्दर्शक होते. काल 18 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार, हिमेश रेशमियाचे वडील कोकिलाबेन रुग्णालयात ॲडमिट होते.

हिमेश रेशमियाच्या वडिलांवर आज म्हणजे 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हिमेशचे वडील हे मोठे संगीत दिग्दर्शक होते. वयाच्या 87 वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते काही काळ अनेक आजारांनी त्रस्त होते. मीडिया रिपोर्टनुसार, हिमेशच्या वडिलांना श्वासनाचा त्रास होता. तो त्रास जास्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विपिन रेशमिया यांचे संगीत मंत्रमुग्ध करून टाकते. त्यांनी सलमान खानच्या चित्रपटाला देखील संगीत दिले आहे. हिमेश आणि सलमान खान यांचे नाते खूप चांगले आहे. सलमानने हिमेश रेशमियाचे संगीत ऐकले होते जे त्याला खूप आवडले. यामुळे भाईजानने हिमेशला 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटात संगीत देण्याची संधी दिली. हिमेशने सलमानच्या अनेक चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले आहे.

हिमेश रेशमिया वयाच्या 6 व्या वर्षापासून वडिलांचे संगीत ऐकत होता आणि त्यानंतर तो स्वतः च्या शैलीत ते गाणे गायचा. लहानपणापासून हिमेशला वडिलांनी संगीताचे धडे दिले होते. एका शोवर हिमेश रेशमिया बोला होता की, "माझ्या वडिलांनी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्यासोबत एक गाणे केले होते मात्र ते कधीही रिलीज झाले नाही." अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

Himesh Reshammiya
Kangna Ranaut: मुंबईतील 32 कोटींच्या बंगल्याबद्दल कंगनाकडून मोठा खुलासा, म्हणाली....

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com