Yoga News
Yoga NewsSaam Tv

Yoga Tips: हिवाळ्यात वाढत्या वजनाला कंट्रोल करायचे आहे? ही योगासने करुन पाहा

Weight Loss Yoga: चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जंक फूड यामुळे शरीरावर खूप परिणाम होतो. त्यात वेळ न मिळाल्याने शरीराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे परिणामी वजन वाढते. या काळात योगासने करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Published on

Yoga For Weight Loss:

सध्याची जीवनशैली खूप जास्त धावपळीची आहे. धावपळीच्या काळात अनेक लोक आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. बाहेरील जंक फूड खातो. तसेच सततच्या वातावरण बदलामुळे खूप जास्त आजारपण पसरताना दिसत आहे. या सर्व गोष्टींमुळे वजन वाढण्याच्या समस्या होत आहे. खूप लोकांना वजन वाढीची समस्या आहे.

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जंक फूड यामुळे शरीरावर खूप परिणाम होतो. त्यात वेळ न मिळाल्याने शरीराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. त्यात वजन वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. उत्तम आरोग्यासाठी शरीराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. पोष्टिक आहार, योगासने आणि व्यायाम करायला हवा. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही योगासने सांगणार आहोत. (Yoga Tips)

धनुरासन

वजन कमी करण्यासाठी धनुरासन हे योगासन फायदेशीर आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे योगासने प्रभावी असते. याशिवाय हात आणि पायाची चरबीदेखील कमी करु शकता. तसेच हे योगासन केल्याने दिवसभर फ्रेश आणि छान वाटते.

अधोमुख श्वासन

अधोमुख श्वासन केल्याने शरीराला खूप फायदा होतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे योगासन अत्यंत महत्त्वाचे आहे. हे योगासन केल्याने स्नायू मजबूत होतात. पचनक्रिया सुधारते आणि रक्ताभिसरण वाढते. पचनक्रिया सुधारल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Yoga News
Chanakya Niti On Success : यशस्वी होण्यासाठी चाणक्यांच्या या टीप्स लक्षात ठेवाच, नेहमी राहाल पुढे

चतुरंग दंडासन

पोटोती चरबी कमी करण्यासाठी रोज चतुरंग दंडासन हे योगान केला. हे योगासन केल्याने वजन कमी होते. तसेच शरीरातील तणाव, थकवा कमी होतो. रोज हे योगासन केल्याने खूप फायदा होतो.

वीरभद्रासन

स्लिम आणि फिट बॉडीसाठी रोज वीरभद्रासन हे आसन करावे. हे आसन केल्याने संपूर्ण शरीर रिलॅक्स होते. त्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते.

Yoga News
Budget SmartPhone : बजेटवाला Infinix pro 14 स्मार्टफोन; मार्केटमध्ये खास कॅमेऱ्यासह इतर फिचर्सची आहे फूल चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com