Subhash Ghai Birthday: दिग्दर्शक सुभाष घई यांच्याबद्दल माहित नसलेल्या खास गोष्टी; एकदा वाचाच

Subhash Ghai News: प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांचा आज ७८ वा वाढदिवस.
Subhash Ghai Turns At Age 78
Subhash Ghai Turns At Age 78Saam TV
Published On

Subhash Ghai Turns At Age 78

प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडच्या टॉप दिग्दर्शकांमध्ये सुभाष घई यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. त्यांच्या दिग्दर्शनाची कायमच सिनेसृष्टीमध्ये चर्चा होते. सुभाष घई यांनी सिनेसृष्टीमध्ये अनेक महत्वाचे बदल केले आहेत. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कामाबद्दल जाणून घेणार आहोत.

Subhash Ghai Turns At Age 78
Pooja Sawant Wedding Plan: अखेर पूजा सावंतने लग्नाची तारीख सांगितली; 'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ

दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ ला नागपूरमध्ये झाला. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, फिल्म इंडस्ट्रीमध्येच आपलं करियर करण्याचं ठरवलं. त्यांचा एक यशस्वी दिग्दर्शक होण्यासाठीचा प्रवास फारच खडतर होता. अवघ्या बॉलिवूडमध्ये, राज कपूर यांना आणि सुभाष घई यांना 'शोमन' म्हणतात. त्यांनी आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनामध्ये ठसा उमटवला आहे. बॉलिवूडच्या या शोमॅनने बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना झळकण्याची संधी दिली.

सुभाष घई हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक आहेत. कालीचरण, हीरो, जंग, कर्मा, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेशी, ताल या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. सुभाष घई यांनी त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीत सुमारे 16 चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले. त्यापैकी 13 चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरले. २००६ मध्ये त्यांना इक्बाल या सामाजिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

Subhash Ghai Turns At Age 78
Oscar 2024: ऑस्करसाठी नामांकनाची यादी जाहीर! जाणून घ्या कोण-कोणत्या सिनेमांचा झाला समावेश

सुभाष घई यांनी 'ताल' चित्रपटाच्या माध्यमातून 'चित्रपट विमा पॉलिसी' आणणारे पहिले बॉलिवूड निर्माते ठरले होते. चित्रपटांना बँकांकडून वित्तपुरवठा करण्याची संकल्पना सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते. इंडस्ट्रीला नवीन कलाकार देण्यासाठी सुभाष घई यांनी 'व्हिसलिंग वूड्स' नावाची ॲक्टिंग स्कूलही उघडली आहे. ही शाळा जगातील टॉप 10 ॲक्टिंग स्कूलपैकी एक मानली जाते. सुभाष घई यांचीही ॲक्टिंग स्कूल मुंबईत आहे. या ॲक्टिंग स्कूलमध्ये अनेक नवख्या कलाकारांना अभिनय आणि चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते.

Subhash Ghai Turns At Age 78
Vaibhav Tatwawadi: यामी गौतमीच्या 'आर्टिकल 370' मध्ये मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, टीझरमध्ये दिसली पहिली झलक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com