57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणार आहे. ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील चित्रपटकर्मी, चित्रपट रसिक आणि सर्जनशील कलाकार एकत्र येणार आहेत. यंदा या महोत्सवासाठी 137 देशांमधून 1,900 हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
यंदाच्या महोत्सवात 86 देशांतील 150 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत. विविध देशांच्या संस्कृती, कला आणि कथाविश्वाचा अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. जागतिक चित्रपट समुदायाचे गोव्यात स्वागत करण्यासाठी राज्य पूर्णपणे सज्ज असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
महोत्सवाचे संचालक आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपटांच्या माध्यमातून विविध देशांच्या संस्कृतींना जोडण्याची ताकद अधोरेखित केली. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, वेगवेगळ्या समाजांचे विचार, परंपरा आणि भावना समजून घेण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदाच्या इफ्फीमध्ये 'फादरलँड' हा उद्घाटनाचा चित्रपट असणार आहे. 'आय मॅटर' हा मध्य महोत्सवी चित्रपट, तर 'वी आर ऑल स्ट्रेंजर्स' या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
यंदा ब्रिक्स देशांच्या चित्रपटसृष्टीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारताचा 'रामायण' हा या विशेष विभागाचा चित्रपट असेल. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील विविधता आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या 'इंडियन पॅनोरमा' विभागात १८ भाषांमधील ७६ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 'धुरंधर' आणि 'बिकमिंग' या चित्रपटांनी या विभागाचे उद्घाटन होणार आहे.
यंदाच्या महोत्सवात स्पेनलाही 'सन्माननीय देश' म्हणून स्थान देण्यात आले आहे, तर रशिया 'भागीदार देश' म्हणून सहभागी होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या चित्रपटसृष्टीला भारतीय प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय सर्जनशील प्रतिभेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'वेव्हज फिल्म बाजार' आणि 'नेटफ्लिक्स' यांच्यात भागीदारी करण्यात आली आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट पदार्पणीय कथात्मक चित्रपट विभागात सात आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. एकूणच, ५७वा इफ्फी हा भारतीय चित्रपटसृष्टीसह जागतिक सिनेमाचा उत्सव ठरणार असून, ८६ देशांच्या चित्रपट संस्कृतींचा अनुभव गोव्यात एकाच ठिकाणी घेता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.