Sonal Chauhan: सोनलची धमाकेदार एन्ट्री, मुन्ना भैय्यासोबत जबरदस्त केमिस्ट्री; 'मिर्झापूर: द मुव्ही'मध्ये हाय-व्होल्टेज गाण्याचा तडका

Mirzapur The Movie: 'मिर्झापूर: द मुव्ही'मधील आयटम साँग आऊट झाले. या गाण्याद्वारे सोनलने धामकेदार एन्ट्री केली. मुन्ना भैय्या आणि रवी किशनसोबत सोनलची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
Sonal Chauhan: सोनलची धमाकेदार एन्ट्री, मुन्ना भैय्यासोबत जबरदस्त केमिस्ट्री; 'मिर्झापूर: द मुव्ही'मध्ये हाय-व्होल्टेज गाण्याचा तडका
Sonal Chauhan Song Saam Tv
Published On
  • मिर्झापूर द मुव्हीमधील सोनल चौहानची धमाकेदार एन्ट्री

  • 'घूम घूम' गाण्यात सोनल चौहानचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे

  • सोनल चौहान आणि मुन्ना भैय्याची जबरदस्त केमिस्ट्री

  • घूम घूम गाण्यात दिव्येंदू आणि सोनल चौहान

Ghoom Ghoom Song Out : ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळवल्यानंतर 'मिर्झापूर' वेबसीरिजचा थरार आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजवर आधारित 'मिर्झापूर: द मुव्ही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासाठी सर्वजण खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक वाट पाहत आहेत. अशातच त्यांची उत्सुकता आणखी शिगेला घालवण्यासाठी या चित्रपटातील धमाकेदार गाणं 'घूम घूम' प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये सोनल चौहानचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. मुन्ना भैय्या आणि रवी किशन यांच्यासोबत सोनल चौहानची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

एक्सेल एंटरटेनमेंट आणि ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेला बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर: द मुव्ही' हा चित्रपट येत्या ४ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्रही मिळाले आहे. चित्रपट रिलीज होण्याला अवघे काही दिवस उरले असताना प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच निर्मात्यांनी चित्रपटातील नवीन हाय-व्होल्टेज पार्टी ट्रॅक 'घूम घूम' गाणं रिलीज केले आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या 'घूम घूम' या गाण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान एका ग्लॅमरस आणि उत्साही अवतारात दिसत आहे. सोनल तिच्या जबरदस्त डान्स मूव्ह्सने पडद्यावर आग लावताना दिसत आहे. तिच्यासोबत या चित्रपटातील मुख्य अभिनेता दिव्येंदू आणि रवी किशन दिसत आहेत. जे या गाण्यात सोनलसोबत नाचून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. या तिन्ही कलाकारांची अनोखी स्टाइल आणि पडद्यावरील त्यांची जबरदस्त केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळत आहे.

Sonal Chauhan: सोनलची धमाकेदार एन्ट्री, मुन्ना भैय्यासोबत जबरदस्त केमिस्ट्री; 'मिर्झापूर: द मुव्ही'मध्ये हाय-व्होल्टेज गाण्याचा तडका
Aamir Khan: "श्वासही घ्यायला देणार नाही..."; सलमाननंतर आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर, सोशल मीडियावर धमकी

'घूम घूम' हे गाणं रिलीज होताच त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणं सर्वांनाच डान्स करायला भाग पाडत आहे. हे धमाकेदार गाणं प्रसिद्ध गायिका रश्मीत कौर आणि संगीतकार रे यांनी गायले आहे. गाण्याचे आकर्षक संगीत रे यांनी दिले आहे तर त्याचे गीत प्रसिद्ध गीतकार कुमार यांनी लिहिले आहे. हे गाणं रिलीज करत निर्मात्यांनी हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी रिलीज होणार असल्याचे सांगितले. हे गाणं रिलीज होताच संगीत प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया रील्सवर ट्रेंड होऊ लागले आहे.

Sonal Chauhan: सोनलची धमाकेदार एन्ट्री, मुन्ना भैय्यासोबत जबरदस्त केमिस्ट्री; 'मिर्झापूर: द मुव्ही'मध्ये हाय-व्होल्टेज गाण्याचा तडका
Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com