Gaarud Movie : एका भयानक रात्रीचं गूढ उलघडायला येतोय 'गारुड'; स्वप्नांच्या शोधात असलेल्या तरुणाची गोष्ट

Mystery Film : 'बापल्योक' फेम शशांक शेंडे लवकरच 'गारुड' चित्रपटातून पेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mystery Film
Gaarud MovieSAAM TV
Published On

शोध हा कधीच संपत नाही. माणूस नेहमीच कशा ना कशाच्या शोधात असतो. बरेचदा हे शोध पूर्ण होतात तर काहीवेळा ही गणिते न उलगडणारी असतात. अशातच एका रात्रीतील अनेक गूढ लवकरच मोठया पडदयावर उलगडण्यास सज्ज होत आहेत. कारण रहस्य उलगडणारा 'गारुड' हा सिनेमा येत्या २५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

स्वप्नांच्या दुनियेत वावरत असताना एखाद्या शोधात गुरफटत गेलेली एक रहस्यमय कथा 'गारुड' या चित्रपटातून समोर येणार आहे. नुकतीच या चित्रपटातील कलाकारांची नावे समोर आली आहेत. काळोखातील प्रकाशाच्या शोधातील हे 'गारुड' चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि कलाकारांची नावे समोर आल्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.

'किमयागार फिल्म्स', 'एल एल पी' आणि 'ड्रीमव्हीवर' निर्मित आणि 'सनशाईन स्टुडिओ' प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निर्माते ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी केली आहे. तसेच सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोद चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोराम यांनी बाजू सांभाळली. चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते, अभिनेते गिरीश कुलकर्णी, दमदार अभिनेते शशांक शेंडे यांसह पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे ही कलाकारांची फौज कथेमागील रहस्य गडद करताना दिसणार आहेत. तर तृप्ती राऊत, संतोष आबाळे, उमा नामजोशी, पंडित ढवळे, वैष्णवी जाधव, सार्थक शिंदे हे सहकलाकार चित्रपटात झळकणार आहेत.

Mystery Film
Suraj Chavan : रितेश भाऊचा स्वॅगच न्यारा, सूरजला दिलं खास गिफ्ट; मोठ्या फसवणुकीपासून वाचवले

'गारुड' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी केले आहे. तर चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित असून रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोराम यांनी संभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताबरोबरचं पार्श्वसंगीत हे वाखाणण्याजोगे आहे. ही पार्श्वसंगीताची धुरा संकेत पाटीलने संभाळली आहे.

चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक प्रताप सोनाळे म्हणाले की, "हा एक काल्पनिक चित्रपट आहे. पण मग यात विशेष असे काय आहे तर याची हाताळणी. ही हाताळणी आपल्या आजच्या वास्तविकतेशी मिळतीजुळती आहे, यातील प्रत्येक गूढ पात्र इतर पात्रांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीतून उलगडत जातं. त्यातूनच त्यांच्या कथेच्या, त्यांच्या शोधाच्या आवृत्त्या सादर होतात, पण ते शोध प्रेक्षकांच्या समोर येतात एका रंजक, गूढ, रहस्यमयी वेशात. 'गारुड' हा रहस्यमय चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Mystery Film
Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित, भावूक होऊन म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com