Comet 67P: ६७ पी नावाच्या धुमकेतूवर सापडल्या ४७ मीटर बर्फाच्या गुहा; लवकरच रहस्यमय गोष्टींचा उलगडा, पाहा PHOTO

Cave on a comet: सापडलेल्या गुहांना असलेल्या खड्ड्यांचा खिडकी प्रमाणे उपयोग होईल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. गुहेमुळे धुमकेतूच्या आताील भागाचा व्यवस्थित अभ्यास करता येणार आहे.
Comet 67P
Comet 67PSaam TV
Published On

Mysteries Comet 67P:

अतिलंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरणाऱ्या ६७ पी नावाच्या धुमकेतूबाबत आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. या धुमकेतूवर गुहा सापडल्या आहेत. सापडलेल्या गुहा तब्बल ४७ मीटर लांबीच्या आहेत. धुमकेतू बर्फापासून बनलेला असतो. त्यात आता बर्फानेच बनलेल्या गुहांचा शोध लागला आहे. खगोलशास्त्रज्ञांसाठी ही फार महत्वाची माहिती आहे.

Comet 67P
MG Comet EV Launch: ठरलं! देशातील सर्वात लहान 'इलेक्ट्रिक कार' 26 एप्रिलला होणार लॉन्च, जाणून घ्या किती असेल किंमत

धुमकेतूची अंतर्गत रचना

खगोलशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांसाठी धुमकेतू हा फार वर्षांपूर्वीपासून अत्यंत आवडीचा विषय आहे. त्यामुळे यावर सापडलेल्या गुहांना असलेल्या खड्ड्यांचा खिडकीप्रमाणे उपयोग होईल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. गुहेमुळे धुमकेतूच्या आतील भागाचा व्यवस्थित अभ्यास करता येणार आहे. तसेच धुमकेतू नेमका कसा तयार होतो याचा शोध घेण्यासाठी देखील या गुहांची मदत होणार आहे.

गेल्या काही वर्षांत धुमकेतूंचा अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक मोहिमा राबवल्या आहेत. यामध्ये इंटरनॅशनल कॉमेटरी एक्सप्लोरर (ICE), Vega 1 आणि Vega 2, Sakigake आणि Suisei, Giotto, Deep Space 1, Stardust, Contour, Deep Impact, EPOXI आणि Rosetta यांचा समावेश आहे.

प्रत्येक मोहिमेत धुमकेतूबाबत विविध माहिती शोधण्यास मदत झाली आहे. धूमकेतू ६७P वरील सर्वात अलीकडील शोध युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोसेटा अंतराळयानाद्वारे करणे शक्य झालं आहे.

Comet 67P
Pune Crime News: बहिणीची छेड काढली म्हणून भाऊ खवळला,केली एका सराईत गुन्हेगाराची हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com