Film Maker Passes Away: गुजराती चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते महेश कलावडिया, ज्यांना “महेश जिरावाला” म्हणूनही ओळखले जाते, यांचे १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाल्याचे DNA चाचणीनंतर स्पष्ट झाले आहे. तब्बल नऊ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, २० जून रोजी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या नमुन्याशी DNA जुळले असल्याचे स्पष्ट केले.
पोलीस सूत्रांनुसार, महेश यांच्या मोबाईलचा शेवटचा GPS स्थिती क्रॅश साइटपासून सुमारे ७०० मीटर अंतरावर होता. अपघातस्थळा जवळ त्यांची स्कूटर सापडली होती, जी जळालेल्या अवस्थेत होती. १२ जून रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास महेश यांनी त्यांच्या पत्नी हेतल यांना Law Garden येथील व्यापार बैठक झाल्याचे सांगण्यासाठी फोन केला होता. काही वेळानंतर कॉल बंद झाला आणि ते अद्याप घरी परतले नाहीत .
अहमदाबाद पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाने DNA चाचणीनंतर त्यांची ओळख पटली आहे. त्यानंतर मृतदेह महेश यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. महेश जिरावाला गुजरातच्या चित्रसृष्टीत सक्रिय व्यक्तिमत्व होते.
त्यांनी ‘Cocktail Premi: Paw of Revenge’ (२०१९) हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि ‘Mahesh Jirawala Productions’ हे त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले. त्यांच्या पश्च्यात पत्नी हेतल आणि २ मुलं असा परिवार आहे. १२ जून २०२५ रोजीचा विमान क्रॅश आणि २० जून २०२५ रोजी DNA चाचणीची झाल्यावर ओळख पटली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.