Akon Video: लोकप्रिय अमेरिकन गायक आणि "छम्मक छल्लो" फेम गायक एकॉन सध्या त्याच्या दौऱ्यासाठी भारतात आहे, त्याचा शेवटचा कार्यक्रम १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. एकॉनचा इंडिया टूर ९ नोव्हेंबर २०२५ पासून दिल्लीत सुरू झाला आणि त्याने १४ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये कॉन्सर्ट झाला. पण, यावेळी एकॉनसोबत असे काही घडले ज्यामुळे सर्वांना धक्का बसला. त्याच्या बेंगळुरू कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकरी असा दावा करत आहेत की एकॉनसोबत हे चुकीचं केलं.
व्हायरल व्हिडिओमध्ये, एकॉन मोठ्या गर्दीत गाणे गाताना दिसत आहे, तेव्हा काही चाहते त्याची पँट खाली करतात. एकॉन गाणे थांबवत नाही, परंतु त्याच्या चेहऱ्यावर एक निराशा स्पष्टपणे दिसते आणि तो पँट वर करत गाणे सुरू ठेवतो. यावेळी एकॉनने आपला संयम राखला आणि शांत राहिला.
चाहते एकॉनची पँट खाली केली म्हणून संतापले नेटकरी म्हटले, "हे प्रेम नाही, ही क्रूरता आणि छळ आहे." एका नेटकऱ्याने लिहिले, "हे दुःखद आहे की एका गायकाला एवढा त्रास देता. तो एक आंतरराष्ट्रीय कलाकार आहे." दुसऱ्याने लिहिले, "हे काय आहे? हे पूर्णपणे असह्य आहे." दुसऱ्याने टिप्पणी केली, "तुम्ही अकोनची पँट का ओढत आहात? ही हरासमेंट आहे.
भारत माझे "दुसरे घर"
भारतात त्याचा कार्यक्रम सादर करण्यापूर्वी, एकॉन म्हणाला होता, "भारताने नेहमीच मला खूप प्रेम दिले आहे. हा देश माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखा आहे. येथील ऊर्जा, संस्कृती आणि चाहते मला फार आवडतात. हा दौरा खास असणार आहे. चला एकत्र इतिहास घडवूया."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.