Shruti Vilas Kadam
इंटरवल वॉकिंगमुळे रक्तप्रवाह सुधारतो, हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हार्ट डिसीजचा धोका कमी होतो.
वेगाने आणि मंद चालण्याच्या मिश्रणामुळे कॅलरीज अधिक जळतात. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होते.
वारंवार वेग बदलल्यामुळे मांडी, पिंडरी आणि पायाचे स्नायू मजबूत व टोन होतात.
इंटरवल वॉकिंग इंसुलिन संवेदनशीलता वाढवते. त्यामुळे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित राहते.
धावण्यापेक्षा चालण्यात सांध्यांवर कमी दबाव येतो. त्यामुळे गुडघेदुखी किंवा सांधेदुखी असणाऱ्यांसाठी हा हलका व्यायाम उत्तम आहे.
रोजची इंटरवल वॉकिंग शरीरातील रक्तप्रवाह वाढवून अवयवांना अधिक ऑक्सिजन व पोषण पोहोचवते.
नियमित इंटरवल वॉकिंगमुळे ऊर्जा वाढते, थकवा कमी होतो, तणाव कमी होतो आणि एकंदर जीवनशैली आरोग्यपूर्ण राहते.