Shruti Vilas Kadam
एका वाटीत १ टीस्पून हळद, २ टेबलस्पून कच्चे दूध आणि हव असल्यास थोडे बेसन मिसळा. नीट पेस्ट तयार करा.
चेहरा हलक्या फेसवॉशने धुवा, जेणेकरून धूळ-मळ निघेल आणि पॅक त्वचेवर नीट बसू शकेल.
पॅक चेहऱ्यावर व मानेला लावून कोरडे होईपर्यंत ठेवा. डोळ्यांच्या भागावर टाळा.
पॅक सुकल्यावर हलक्या हाताने गोलाकार हालचालीत पाणी घालून स्वच्छ धुवा. याने मृत त्वचा निघते.
हळदीतील करक्यूमिन त्वचेतील काळेपणा कमी करते, आणि दुधातील लॅक्टिक ॲसिड त्वचेला नैसर्गिक ग्लो देते.
हळद अँटीबॅक्टेरियल असून पिंपल्स कमी करुन डल स्किन दूर करण्यात मदत करते. दूध त्वचेची कोमलता व आर्द्रता राखते.
नियमित वापराने मेलॅनिन कमी होण्यास मदत होत असल्याने पिग्मेंटेशन कमी होते, त्वचा सॉफ्ट आणि ग्लोईंग होते तसेच सूक्ष्म सुरकुत्या कमी दिसतात.