Shruti Vilas Kadam
बारीक आणि विरळ पलकांऐवजी दाट आणि लांब पापण्यांसाठी घरगुती उपाय आजमावा. २० लवंगांचा वापर करून तुम्ही नैसर्गिकरीत्या पापण्यांची वाढ करू शकता.
एक चमचा नारळाचे तेल घ्या आणि त्यात २० लवंग टाका. हे मिश्रण मंद आचेवर काही मिनिटे उकळा, यामुळे लवंगातील गुणधर्म तेलात मिसळतात.
तेल थंड झाल्यावर त्यात दोन व्हिटॅमिन E कॅप्सूल घाला. हे पापण्यांच्या कूपांना पोषण देऊन वाढीस मदत करतात.
तयार झालेले हे मिश्रण स्वच्छ मस्कारा ब्रशने पापण्यांच्या मुळाशी हलक्या हाताने लावा. तेल डोळ्यात जाऊ देऊ नका.
हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास जास्त उत्तम ठरतो. तेल रात्रभर पापण्यांच्या कूपांना पोषण देते.
दररोज ७-१० दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास पापण्यांचा घनपणा आणि लांबी वाढलेली जाणवेल.
डोळे संवेदनशील असतात, त्यामुळे काही त्रास जाणवल्यास त्वरित वापर थांबवा आणि डोळ्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या.