Shruti Vilas Kadam
२ लिटर फुल-फॅट दूध, १ टेबलस्पून लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, ½ कप साखर, थोडी वेलची पूड आणि सजावटीसाठी बदाम-पिस्ता लागतील.
एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळा. ते उकळल्यावर त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. दूध फाटल्यावर त्यातील पाणी (छेना वे) आणि घट्ट भाग वेगळा करा.
फाटलेले दूध गाळून घ्या आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळू द्या. हा घट्ट दुधाचा भाग म्हणजे छेना तोच कलाकंदाचा बेस आहे.
एका पॅनमध्ये हा छेना आणि साखर घालून मध्यम आचेवर परतत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळा, जेणेकरून तळाला लागू नये.
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड आणि थोडं तूप घाला. यामुळे सुगंध आणि चव दोन्ही वाढतात.
हे मिश्रण तुपाने लावलेल्या ट्रेमध्ये ओतून समान पसरवा. वरून बारीक चिरलेले बदाम आणि पिस्तावरुन टाका. दोन तास थंड होऊ द्या.
मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करा आणि सर्व्ह करा. कलाकंद फ्रीजमध्ये ३ ते ४ दिवस टिकतो.