Trisha Krishnan: CM विजय यांच्या चाहत्याची हटके रिक्वेस्ट; विनंती ऐकताच तृषा कृष्णन त्रिशा झाली लाजून लाल, VIDEO

Trisha Krishnan: तृषा कृष्णनचा आणखी एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यावेळी जेव्हा एका चाहत्याने त्रिशाला मुख्यमंत्री विजय यांच्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांचे नाव ऐकताच अभिनेत्री लाजून लाल झाली.
trisha krishnan and vijay thalapathy
trisha krishnan and vijay thalapathySaam Tv
Published On

Trisha Krishnan: तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय सध्या केवळ सिनेमांमुळे नाही, तर राजकारणातील यशस्वी वाटचालीमुळेही चर्चेत आहे. तमिळनाडूच्या नव्या राजकीय नेतृत्वामध्ये त्याचं नाव घेतलं जात असून, मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात अभिनेत्री तृषा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सध्या सोशल मीडियावर तृषाचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या आगामी ‘Karuppu’ चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी जाताना दिसते. कार्यक्रमस्थळी चाहत्यांनी तिच्या गाडीभोवती मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित असलेल्या एका चाहत्याने मुख्यमंत्री विजय यांच्याबाबत तृषाला तमिळ भाषेत खास विनंती केली. चाहत्याने तिला विजयपर्यंत एक संदेश पोहोचवण्यास सांगितलं. त्यावर तृषाने हसत “हो” असं उत्तर दिलं. मात्र, त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं लाजरं हास्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं.

trisha krishnan and vijay thalapathy
Famous Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; परिवाराने लपवली निधनाची बातमी

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी “विजयचं नाव ऐकताच तृषा लाजली” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी दोघांची केमिस्ट्रीची पुन्हा चर्चा करायला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विजय आणि तृषा यांच्या नात्याबाबत अफवा पसरत आहेत. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून, त्यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते.

trisha krishnan and vijay thalapathy
Ranbir Kapoor:'रामायण'च्या रिलीजआधी रणबीर झाला अयोध्यावासी; राम मंदिराजवळ खरेदी केली प्रॉपर्टी, किंमत जाणून व्हाल अवाक

दुसरीकडे, सोशल मीडियावर या व्हिडिओवरून टीकाही होताना दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी विजयची पत्नी संगीता हिचा उल्लेख करत कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली, विजय अजूनही सिंगल नाही त्यांचं लग्न झालं आहे. आणखी एकाने कमेंट केली, अरे संगीताचा पण विचार करा. विजय अद्याप विवाहित असल्याने या चर्चांवरून वाद निर्माण झाला आहेत. काही वृत्तांमध्ये विजय आणि त्याची पत्नी संगीता यांच्यात मतभेद असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र, या संदर्भात विजय किंवा तृषा यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com